निवृत्तीचे वय 60 वर्षे व पाच दिवसाचा आठवडा याबाबत निर्णय अंतिम टप्प्यात - मुख्यमंत्री.

मुबंई : " केंद्राच्या सरंचनेनुसार व केंद्राने लागु केलेल्या दिनांकापासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ देण्यात येईल ,"अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज दिली.
cm-in-govt-officers-function
cm-in-govt-officers-function

मुबंई : " केंद्राच्या सरंचनेनुसार व केंद्राने लागु केलेल्या दिनांकापासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ देण्यात येईल ,"अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज दिली.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 32 व्या वर्धापन  दिन कार्यक्रमात ते आज बोलत होते.यावेळी व्यासपिठावर मुख्य सचिव सुमीत मलीक ,संघटनेचे संस्थापक  र.ग.कर्णीक ,अध्यक्ष विनोद देसाई,सल्लागार ग.दि.कुलथे,सरचिटणीस समीर भाटकर,धर्मादाय आयुक्त शिवकुमार दिघे उपस्थित होते.

सातव्या वेतन आयोगासंबंधी बक्षी समीतीचे काम सुरू असुन आजच समीतीने पोर्टल सुरू केले असल्याचे सांगुन मुख्यमंत्री म्हणाले की ,"गुणवत्तापुर्ण कामासाठी वेतन आयोग महत्वाचा आहे.या पोर्टलवर अधिकारी महासंघाने माहिती भरावी.वेतन त्रुटी राहु नये याची दक्षता घ्यावी.वेतन आयोगासाठी अर्थसंकल्पात तरतुद करण्यात येईल."

" महासंघाच्या मागणीनुसार महागाई भत्ता फेब्रुवारीपासुन रोखीने देण्यात येईल.थकबाकीबाबत संघटनांशी चर्चा करुन तो लाभही देण्यात येईल. शासन व प्रशासन लोकशाहीच्या रथाची दोन चाकं   असल्याने ही व्यवस्था चालविण्याची सामाजिक जबाबदारी शासन व अधिकारी कर्मचारी यांची आहे.  महिलां अधिकारी कर्मचारी याची प्रमुख मागणी असलेल्या बालसंगोपन रजेचा विषय लवकरच मंत्रीमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवणार आहे," असे  मुख्यमंत्र्यांनी सांगीतले.

कुटुंब निवृत्तीवेतन पुर्नविवाहानंतरही सुरू ठेवणार असेही त्यांनी यावेळी आश्वस्त केले.

निवृत्तीचे  वय 58 वरून 60 व पाच दिवसाचा आठवडा याबाबत निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचेही  त्यांनी यावेळी सांगीतले.

अधिकारी कर्मचारी हा प्रशासनाचा कणा आहे . व्यवस्था सुरळीत चालावी म्हणुन महासंघाचे सहकार्य अपेक्षीत आहे. महासंघाच्या आर्थिक धोरणाशी सुसंगत मागण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी यावेळी आश्वस्त केले.

यावेळी र.ग.कर्णीक यांना जिवनगौरव पुरस्कार व उत्कृष्ट कामगिरीसाठी  धर्मादाय आयुकत शिवकुमार दिघे यांचा सत्कार करण्यात आला.

नाशिक ,पुणे, लातुर, मुबंई शहर व मुबंई उपनगर  ,वर्धा जिल्हा समन्वय समीतीच्या उत्तम कार्यासाठी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मीनल जोगळेकर तर आभार मीना आहेर यांनी मानले.

सातव्या आयोगानुसार वेतन देण्याबाबत कधीपर्यंत निर्णय होणार हे गुलदस्त्यात ठेवल्याने पुन्हा आधिकारी कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा पडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com