decalir drought raju shettys demond | Sarkarnama

दुष्काळ जाहीर करा नाहीतर मंत्र्यांना शेतकरी ठोकून काढतील : राजू शेट्टी 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

वडूज (जि. सातारा) : खटाव तालुक्‍याला दुष्काळ यादीतून वगळले गेले हे येथील लोकप्रतिनीधी व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे अपयश आहे. दुष्काळ जाहीर केला असता तर अनेक सवलती द्याव्या लागल्या असत्या. त्यामुळे या बाबींतून पळ काढण्यासाठीच सरकारने अधिकाऱ्यांना हाताशी धरून खटाव तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळला आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला. 

संपूर्ण खटाव तालुक्‍याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, या मागणीसाठी येथे विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांतर्फे आज खर्डा भाकरी खावून काळी दिवाळी साजरी केली. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खासदार शेट्टी येथे आले होते. 

शेट्टी म्हणाले, दुष्काळाचे नेमके निकष काय? दुष्काळी तालुक्‍याला चारा छावण्या, विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क, शेतकऱ्यांची कर्जे व विज बिले माफ करावी लागण्याबरोबरच अनेक सवलती द्याव्या लागल्या असत्या. त्यामुळे या बाबींतून पळ काढण्यासाठीच सरकारने अधिकाऱ्यांना हाताशी धरून या तालुक्‍यावर अन्याय करून हा तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळला आहे. आधी दुष्काळ जाहीर करा नाहीतर मंत्र्यांना शेतकरी ठोकून काढतील, असा सल्लाही त्यांनी दिला. 

संबंधित लेख