ddr cancels lende`s directorship from junnar market committee | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

रघुनाथ लेंडे यांचे जुन्नर बाजार समितीचे संचालकपद रद्द : डीडीआरचे आदेश

मीननाथ पानसरे
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

आपटाळे : जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती तसेच संचालकपदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी रघुनाथ लेंडे यांचे संचालकपद रद्द करण्याच्या बाजार समितीच्या ठरावावर जिल्हा उपनिबंधकांनी शिक्कामोर्तब केले. लेंडे यांचे पद रद्द करण्याबाबतचा आदेश त्यांनी दिला आहे.
 

आपटाळे : जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती तसेच संचालकपदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी रघुनाथ लेंडे यांचे संचालकपद रद्द करण्याच्या बाजार समितीच्या ठरावावर जिल्हा उपनिबंधकांनी शिक्कामोर्तब केले. लेंडे यांचे पद रद्द करण्याबाबतचा आदेश त्यांनी दिला आहे.
 
लेंडे यांनी रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे, बोगस ठराव व प्रोसिडिंग लिहिणे, वारुळवाडीतील मुरूम उत्खननाची 38 लाख 74 हजार 80 रुपये रक्कम सहकारी दिनकर कारभारी कुतळ यांच्या खात्यात जमा करणे, संस्थेचे भत्ता रजिस्टर दीर्घकाळ स्वतःकडे ठेवत त्यात खाडाखोड करणे, संचालिका सुमन बोऱ्हाडे यांचा त्यांच्या खोट्या सहीचा राजीनामा सभेत सादर करत खोटे इतिवृत्त लिहिण्यास भाग पाडणे, प्रोसिडिंग बुकमध्ये खाडाखोड करने, छपाई करणाऱ्या दुकानदारास सभेची मंजुरी नसताना ऍडव्हान्स म्हणून सहा लाखाचे बिल देणे, जुन्नरमधील व्यापारी गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेत संस्थेचे आर्थिक नुकसान करणे, टोमॅटो व्यापाराचा परवाना देण्यासाठी व्यापाऱ्यांची आर्थिक लूट करणे, याबाबत लेंडे यांना बाजार समितीने "कारणे दाखवा' नोटीस बजावली होती.

लेंडे यांचे संचालकपद रद्द करण्याची मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही केली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी सभापतींना चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार 2 फेब्रुवारी 2018 रोजीच्या मासिक सभेत संचालक रघुनाथ लेंडे यांचे संचालकपद रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. हा ठराव जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविला होता. बाजारसमितीचा ठराव कायम करत जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी लेंडे हे बाजार समितीच्या संचालकपदावर राहण्यासाठी अपात्र असल्याचे घोषित करून त्यांना पदावरून काढून टाकण्याचा आदेश दिला. 

अडचणींमध्ये वाढ 

माजी सभापती रघुनाथ लेंडे त्यांच्यापुढील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुरूम उत्खननातील अपहाराची रक्कम लेंडे यांनी भरल्याने सध्या ते जामिनावर मुक्त आहेत. ते भविष्यात कोणता पवित्रा घेतात, याकडे सहकार व राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख