दाऊदचा मुनिम जाबिर मोतीला अटक

1993 च्या मुंबई साखळी बाँबस्फोटातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड दाऊदची चोहोबाजूंनी कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार ब्रिटनच्या सुरक्षा दलाने दाऊदचा फायनान्स मॅनेजर जाबिर मोतीला अटक केली आणि त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. जाबिरला एका हॉटेलमध्ये अटक करण्यात आली.
दाऊदचा मुनिम जाबिर मोतीला अटक

नवी दिल्ली/लंडन : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा फायनान्स मॅनेजर जाबिर मोतीला ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे. दाऊदचा 'मुनिम' म्हणून ओळखला जाणारा जाबिर मोती हा पाकिस्तानात राहत होता आणि दाऊदचे जगभरातील आर्थिक व्यवहार सांभाळायचा.

1993 च्या मुंबई साखळी बाँबस्फोटातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड दाऊदची चोहोबाजूंनी कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार ब्रिटनच्या सुरक्षा दलाने दाऊदचा फायनान्स मॅनेजर जाबिर मोतीला अटक केली आणि त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. जाबिरला एका हॉटेलमध्ये अटक करण्यात आली. कराची आणि दुबईत जाबिरचे आर्थिक व्यवहार दाऊद आणि त्याची पत्नी आणि निकटवर्तीयांशी होत असे. त्याचा फायदा उचलत ब्रिटनने सापळा रचला आणि त्याला अटक केली. 

खऱ्या अर्थाने दाऊदचे सर्व आर्थिक व्यवहार जाबिर पाहायचा. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मोती हा दुबई, आफ्रिकेसह अन्य देशांत दाऊदचे व्यवहार पाहायचा. त्याच्यावर तस्करीसह अनेक कारवायात सहभागी असल्याचे आरोप आहेत. जाबिरकडे पाकिस्तानी पासपोर्ट सापडला असून त्यावर कराचीचा पत्ता आहे. त्याच्याकडे ब्रिटनचा दहा वर्षांचा व्हिसा देखील आहे. दाऊदची पत्नी महजीसमवेत तो पैशाचे व्यवहार सांभाळायचा. एवढेच नाही तर तो सक्रिय रूपातून दाऊदच्या कुटुंबीयांना मदत करत असे. कराचीत दाऊदच्या निवासस्थानाच्या परिसरातही त्याचे घरही आहे. जाबिर मोती हा ऍटिंग्वा, बार्बाडोस, हंगेरी आणि डॉमिनिकन रिपब्लिकचे नागरिकत्व घेण्यासाठी प्रयत्नशील होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com