भोसरीत महेश लांडगे आणि दत्ता साने यांच्यात आतापासूनच स्ट्राईक, प्रती स्ट्राईक

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी आणि दिघीला जोडणारा व गेली पंचवीस वर्षे प्रलंबित रस्ता सर्जिकल स्ट्राईक करीत मंगळवारी एका रात्रीत पूरा केल्याचा दावा भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी आज बुधवारी केला.
भोसरीत महेश लांडगे आणि दत्ता साने यांच्यात आतापासूनच स्ट्राईक, प्रती स्ट्राईक

पिंपरीः पिंपरी-चिंचवडमधील भोसरी आणि दिघीला जोडणारा व गेली पंचवीस वर्षे प्रलंबित रस्ता सर्जिकल स्ट्राईक करीत मंगळवारी एका रात्रीत पूरा केल्याचा दावा भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी आज बुधवारी केला. 

सर्जिकल स्ट्राईक करायला भोसरी दिघी हा पाकिस्तानमधील प्रांत आहे का, असा हल्लाबोल या दाव्याचा खरपूस समाचार घेताना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे गटनेते दत्ताकाका साने यांनी लगेच केला. 

विकासकामांचा हा कांगावा म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वीचे थोतांड असून एका रात्रीत रस्ता होईलच कसा अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

लांडगे यांची भोसरीतून भाजपकडून उमेदवारी जवळपास नक्की आहे. तर साने हे सुद्धा राष्ट्रवादीकडून आशावादी आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या विधानसभा निवडणूक आढावा बैठकीत साने यांनी आपण इच्छूक असल्याचे शरद पवार आणि इतर ज्येष्ठ नेत्यांसमोरही सांगितले आहे.त्यामुळे त्यांची व लांडगेंनीही जोरदार तयारी विधानसभेची आतापासून सुरु केली आहे.त्यातून लांडगेंवर टीका करण्याची एकही संधी साने सोडत नाहीत. त्यातून ते लांडगेवर असे टीकेचे सर्जीकल स्ट्राईक करीत असतात.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेतेच या रस्त्यात जागा जाणाऱ्या मालकांचे कान भरत असल्याने अडसर आला होता, असे स्थानिक नगरसेवक सागर गवळी यांनी सांगितले. मी व लांडगे यांनी जागामालकांची समजूत काढल्याने अनेकदा भुमीपूजन होऊन अनेकदा बंद पडलेला हा रस्ता होऊन लगेच त्यावरून वाहतुकही सुरु झाल्याने दिघी व भोसरीकरांचा साडेचार किलोमीटरचा वळसा वाचला असल्याचे ते म्हणाले.
 
लांडगे यांचा दाव्याची शहानिशा `सरकारनामा'ने केली. त्यावेळी मिळालेली माहिती अशी :  भोसरी-दिघीला जोडणारा हा रस्ता पूर्वीही होता. फक्त तो कच्चा होता. पायवाट होती. 2017 ला त्याचे निम्मे कामही झालेले आहे. मात्र, खासगी जागामालकांच्या आक्षेपामुळे त्याचे काम पुन्हा बंद पडले होते. या मालकांचे मन लांडगेंनी वळविले. परिणामी पालिकेच्या खर्चातून बांधण्यात येत असलेल्या या अर्धवट कच्या रस्त्याचे डांबरीकरण काल झाले.15 मीटर रुंद व तीनशे मीटर लांबीचा हा रस्ता तूर्त नऊ मीटरचा करण्यात आला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com