datta meghe | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

दत्ता मेघे यांची आता स्वतंत्र विदर्भाची मागणी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 एप्रिल 2017

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी स्वतंत्र विदर्भाचा राग आळवला आहे. भाजपने आतापर्यंत विदर्भाबाबत सावध भूमिका घेतलेली असताना मेघे यांनी विदर्भाची मागणी करून भाजपसमोर अडचणी निर्माण केल्याचे बोलले जात आहे. आजच्या बैठकीला त्यांचे सुपुत्र आमदार समीर मेघे मात्र उपस्थित नव्हते. 

गेल्या काही महिन्यांपासून दत्ता मेघे भाजपच्या नेत्यांवर नाराज आहे. आमदार समीर मेघे यांना मंत्रिपद दिले नाही तसेच दत्ता मेघे यांना राज्यपालपद न दिल्याने ही नाराजी वाढली आहे. यामुळे आता विदर्भ प्रदेश विकास परिषदेचा उपयोग दबाव टाकण्यासाठी केला जाणार आहे. कॉंग्रेसमध्येही असतानाही त्यांनी याच राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. 

विदर्भातील महत्त्वाचे जवळपास दीडशे कार्यकर्ते आज उपस्थित होते. यावेळी दत्ता मेघे यांनी स्वतंत्र राज्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नसल्याचे स्पष्ट केले. या प्रस्तावाला कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांची स्थिती खराब असल्याने कर्जमाफी करण्यात यावी, अशीही मागणी आजच्या मेळाव्यात करण्यात आली. या दोन्ही मागण्या भाजपसाठी अडचणीच्या आहेत. या मागण्यांवर मेघे यांनी जोर दिल्याने भाजपच्या नेत्यांसमोर आता अडचण निर्माण झाल्या आहेत. 

संबंधित लेख