danve and shivsena | Sarkarnama

सुदाम सोनवणेंचा आता शिवसेनेशी संबंध नाही - अंबादास दानवे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : नारायण राणे यांची 2005 मध्ये शिवसेनेतून हकालपट्टी केली होती. त्याचवेळी सुदाम सोनवणे हे देखील त्यांच्यासोबत कॉंग्रेसमध्ये गेले होते. शिवसेनेचे ते माजी महापौर होते पण कॉंग्रेसमध्ये गेल्यापासून त्यांचा आणि शिवसेनेचा संबंध राहिलेला नाही असे स्पष्टीकरण शिवसेनेच जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केले. 

मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत सुदाम सोनवणे यांनी आज (ता. 30) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. सोनवणे यांचा उल्लेख प्रसार माध्यमांनी शिवसेनेचे माजी महापौर असा केल्यामुळे अंबादास दानवे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे त्याबाबत स्पष्टीकरण केले आहे. सुदाम सोनवणे शिवसेनेचे माजी महापौर होते, पंरतु त्यांना पक्ष सोडून तेरा वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. आज घडीला त्यांचा आणि शिवसेनेचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे शिवसेनेच्या कुठल्याही माजी पदाधिकाऱ्याने मनसेमध्ये प्रवेश केलेला नाही असे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे. 
 
संबंधित लेख