danave confident about alliance with shivsena | Sarkarnama

शिवसेनेसोबत केवळ बसायचं आणि युतीची घोषणा करायची, एवढेच बाकी : दानवे

लक्ष्मण सोळुंके
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

शिवसेना ही सरकार आणि भाजपवर कितीही टीका करत असली तरी युती होणार असल्याचा विश्वास भाजपच्या नेत्यांना आहे. 

जालना : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीच फाॅर्म्यूला ठरला आहे. केवळ बसायचं आणि घोषणा करायची, एवढचं बाकी आहे, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेव दानवे यांनी व्यक्त केला.

जालना येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की मागची विधानसभा सोडली तर गेली 25 वर्ष आम्ही शिवसेने सोबत आहोत. समविचारी पक्षांनी मतांचे विभाजन टाळावे, काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा होऊ नये म्हणून युतीचा प्रयत्न आम्ही आमच्या बाजूने करतो, शिवसेनेला याबाबत निर्णय घ्यायचा आहे.

शिवसेना कोणती भाषा वापरते त्यावर आमचा आक्षेप नाही. आम्ही शेवटपर्यंत युतीसाठी प्रयत्न करू आम्ही जाहिरपणाने सांगतोय आम्हाला युती करायची आहे, असेही आवाहन त्यांनी केले.

नवा आणि जुना असा काही प्रस्ताव  नाही, युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. केवळ बसायचं आणी युतीची घोषणा करायची एवढंच बाकी आहे. त्यासाठी केंद्रातील नेतृत्व तयार असणंनसणे हे काही विशेष नाही, आम्ही किती जागा लढलो हे सर्वांना माहीत आहे, असाही खुलासा दानवे यांनी केला.

शिवसेना बाहेर काहीही बोलत असली तरी मंत्रीमंडळातील निर्णय सर्व संमतीने होतात, वाद बाहेर आहेत सरकार मध्ये काहीच नाही, असा दावा दावने यांनी केला.

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची एका हाॅटेलमध्ये भेट झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. त्यावर दानवे म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री कोणालाही भेटू शकतात, असेही समर्थन त्यांनी केले.

संबंधित लेख