danave and nagar election | Sarkarnama

भाजपच्या विजयासाठी दानवेंकडून विशाल गणेशाला साकडे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

नगर : नगर महापालिका बहुमताने जिंकण्याचा निश्‍चय करून स्वतंत्रपणे रिंगणात उतरलेल्या भारतीय जनता पक्षाने निवडणूक प्रचाराचा नारळ आज संध्याकाळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते वाढविला. माळीवाडा येथील विशाल गणेशाची आरती करून दाणवे यांनी गणपतीला विजयासाठी साकडे घातले. 

दानवे यांच्यासह खासदार दिलीप गांधी, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, ज्येष्ठ नेते अभय आगरकर आदींच्या उपस्थितीत दानवे यांनी प्रचाराचा नारळ आज सायंकाळी साडेसात वाजता वाढविला. यावेळी फटाक्‍यांची आतषबाजी करीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यानंतर नगर शहरातून रॅली काढून दिल्लीगेटमार्गे सभास्थळी ही रॅली दाखल झाली. फटाक्‍यांची आतषबाजी, मोटारसायकलवरील शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. 

आगरकर - गांधी यांच्यात एकी 
ज्येष्ठ नेते अभय आगरकर व खासदार दिलीप गांधी यांच्या दोन्ही गटात मागील तीन-चार वर्षांपासून कायम विरोध होता. स्थानिक शाखांच्या पदाधिकारी निवडीवरून तर अनेकदा कार्यकर्ते आमने-सामने झाले होते. तथापि, त्यांच्यात मनोमिलन झाल्याचे काही महिन्यांपूर्वी त्यांनी जाहीर केले होते. तथापि, अंतर्गत धुसफूस चालूच होती. मुंबईमध्ये झालेल्या एका बैठकीत गांधी-आगरकर यांच्यात पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनोमिलन घडवून आणल्याचे सांगितले जाते. आता केडगाव येथील कॉंग्रेसच्या फोडाफोडीच्या दरम्यान आगरकर व खासदार गांधी यांची एकी दिसून आली. आज तर दानवे यांच्यासोबत उघड्या जीपमधून त्यांनी एकत्रित केलेले शक्तीप्रदर्शन विरोधकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले. 

संबंधित लेख