danave | Sarkarnama

दानवेंच्या नावावर फसवणूक करणाऱ्याला जालन्यात अटक

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 मे 2017

जालना : आपल्या नावाने लोकांना टोप्या घालून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या गणेश बोरसे या तरुणाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 
या प्रकरणाचा संपूर्ण तपशील अद्याप हाती आलेला नाही. पण जालना शहरातील गणेश बोरसे हा इसम बदल्या करून देतो, अनुदान मिळवून देतो, सरकारी मदत मिळवून देतो, आपली दानवे साहेबांशी ओळख आहे आपण तुमचे काम करून देऊ अशी बतावणी हा गृहस्थ करत असे. अशी खोटी आमिषे दाखवून त्याने शहरातून आणि परिसरातून अनेकांना फसवले असून कोट्यवधी रुपये गोळा केल्याचा पोलिसांना संशय आहे. 

संबंधित लेख