Dahihandi : Fadanvis attends but Udhhav Thakray remains aloof | Sarkarnama

 ठाण्यातील दहीहंडीला फडणवीसांची उपस्थिती तर उद्धव ठाकरेंची पाठ

राजेश मोरे
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

गोविंदा पथकातील सळसळत्या ऊर्जेचा खऱया अर्थाने ठाव घेत शिवसेनेचे दिवगंत नेते आनंद दिघे यांनी मंुबईतील नावाजलेल्या गोविंदा पथकांना ठाण्याची वाट पकडण्यास भाग पाडले होते.

ठाण्यातील हंडीवर भाजप आणि मनसेचा ठसा

ठाणे :  गोविंदा पथकातील सळसळत्या ऊर्जेचा खऱया अर्थाने ठाव घेत शिवसेनेचे दिवगंत नेते आनंद दिघे यांनी मंुबईतील नावाजलेल्या गोविंदा पथकांना ठाण्याची वाट पकडण्यास भाग पाडले होते. त्यानंतर टेंभी नाक्याच्या हंडीची जबाबदारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर आल्यानंतर मानाची हंडी म्हणून टेंभी नाक्याच्या हंडीचे स्थान कायम राहिले असले तरी आजच्या घडीला ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध हंडीचा मान यंदा भाजपचे माथाडी कामगार नेते शिवाजी पाटील आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हंडीकडे गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्वजून ठाण्यात लावलेली हजेरी आणि गेल्या दोन वर्षापासून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील मराठ मोळ्या उत्सवाकडे फिरवलेली पाठ राजकीय सारीपाट चर्चेचा विषय आहे.

टेंभी नाका येथे ठाण्याबरोबरच मंुबईच्या मंडळांसाठी वेगळी हंडी बांधण्याची परंपरा सुरु करण्यात आली होती. मंुबईची मंडळात संख्येने जास्त गोविंदा असल्याने त्यांच्याकडून थराथर लिलिया रचले जातात. अशावेळी ठाण्यातील गोविंदा पथकांनाही स्थान मिळावे यासाठी दिड दिड लाखांच्या दोन हंडया बांधण्याची परंपार सुरु करण्यात आली. या लाखो रुपयांच्या पारितोषिकामूळे मंुबईतील अनेक गोविंदा पथकांचे पावले ठाण्याकडे वळाली होती. पण आनंद दिघे यांचे निधन झाल्यानंतर सुमारे दोन ते तीन वर्षाकरीता ही हंडी आनंद सेनेच्या ताब्यात होती. त्यावेळी शिवसेनेची मोठ्या हंडीबरोबरची बांधिलकी कायम राहावी यासाठी ईषेने खासदार राजन विचारे यांनी जांभळी नाका येथे दहिहंडी उत्सव सुरु केला. पण त्यानंतर पुन्हा एकदा टेंभी नाक्यावरील हंडीचे आयोजकपद एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविणयात आल्यानतर ही हंडी जल्लोषात साजरी केली जाऊ लागली.

पण दरम्यान पूलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने पांचपाखाडी येथील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि वर्तकनगर येथील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची हंडी गोविंदा पथकामध्ये प्रचंड प्रसिद्ध झाली होती. सरनाईक यांच्या येथे पहिल्यादा नऊ थरांचा मानवी मनोरा रचण्यात जय जवान गोविदा पथकाला यश मिळाले होते. अशा वातावरणात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आर्वजून या मराठमोळ्या उत्सवासाठी ठाण्यात येत असत. ते नसल्यास युवासेनापमुख आदित्य ठाकरे यांची उपस्थिती असे. कारण ठाण्यातील प्रमुख पाच हंडयापैकी चार हंडया शिवसेना नेत्यांच्या होत्या. पण गेल्या दोन वर्षापासून यामध्ये खंड पडला आहे.

मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी तर पक्षाचा आदेश प्रत्यक्षात अंमलात आणून गेल्या वर्षापासूनच मानवी मनोऱयासाठी अकरा लाख रुपये देण्याची परंपारा सुरुच ठेवली आहे. त्यामूळे या हंडीला उपस्थिती लावण्यासाठी मंुबईतील पथकामध्ये चढाओढ असते. पण यंदा प्रथमच दणक्यात भाजपचे माथाडी कमगार नेते शिवाजी पाटील यांनी दहिहंडी उत्सवात एंट्री करुन अकरा लाखांचे बक्षिस जाहीर करुन मनसेच्या एवढाच प्रसिद्दीचा झोत भाजपच्या हंडीकडे वळविण्यात यश मिळवले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दहिहंडीला उपस्थित राहून मराठामोळ्या उत्सवाच्या माध्यमातून युवकांबरोबर संवाद साधला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने ठाण्याचे महत्त्व मोठे आहे. त्यामूळेच भाजपच्या नेत्यांनी तरुणांना जवळच्या वाटणाऱया उत्सवाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. पण गेल्या वर्षीपर्यंत ठाण्यातील दहिहंडी उत्सवावर शिवसेनेचा असलेला वरचष्मा यंदा कमी झाल्याचे पाहावयास मिळाले. भाजपचे वरिष्ठ नेते हिरहिरीने या उत्सवात सहभागी होत असताना शिवसेनेच्या प्रमुखांनी मात्र सारी भिस्त शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर टाकून मंुबईत राहणे पसंत  केल्याचे पाहवयास मिळाल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.

संबंधित लेख