dada bhuse on hire | Sarkarnama

हिरे कुटुंबियांचे भुजबळप्रेम "मत'लबी : दादा भुसे 

संपत देवगिरे 
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

नाशिक : "कालपर्यंत छगन भुजबळांचा एकेरी भाषेत उल्लेख करणारे, समाजाची अवहेलना करणारे हिरे कुटुंबीय निवडणुकीच्या राजकारणासाठी दिवाळीत गावोगावी छगन भुजबळांचे होर्डीग्ज लावत फिरत आहेत. मात्र अशा लोकांचे खरे रुप, राजकारण समाज ओळखून आहे. त्याचा काहीही फायदा होणार नाही', अशी टिका शिवसेना नेते राज्यमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. 

दिवाळीनिमित्त शुभेच्छा मेळाव्यात बोलताना दादा भुसे यांनी आपले पारंपरिक विरोधक भाजपचे नेते अद्वय हिरे व हिरे कुटुंबियांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, अद्वय हिरे यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा उल्लेख कधीही आदराने केला नाही. त्यांच्या कामकाजाला सातत्याने विरोध केला. एकेरी बोलताना त्यांनी भुजबळांच्या समाजावर टिप्पण्णी केली. हे सर्व फार जुने नाही. अगदी ताजे आहे. मात्र सध्या त्यांना निवडणुकीची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे त्यांनी गावोगावी छगन भुजबळांचा फोटो असलेले दिवाळीच्या शुभेच्छांचे फलक लावले आहेत. या फलकांना मतदार भुलणार नाहीत. 

ते म्हणाले, हिरे यांनी कधीच मालेगाव सोडले आहे. ते पर्यटनासाठी इकडे येतात. सतत सत्तेसोबत राहणारे हे कुटुंब आहे. पन्नास वर्षात त्यांनी या सत्तेचा परिसराच्या विकासासाठी काय उपयोग केला, याचा हिशेब जनतेला द्यावा. मी फक्त गेले तीन वर्षे राज्यमंत्री आहे. या काळात तालुक्‍यात कधी लाल दिवा मिरवलेला नाही. तालुक्‍यातील सामान्य नागरिक, कार्यकर्ता व आपल्यात अंतर नको, ही भावना होती. त्याचा उपयोग केवळ विकासासाठी केला. विकासाच्या अनेक योजना व निधी आणला. पर्यटनासाठी मालेगावला आलेल्यांना जनता थारा देणार नाही याची खात्री आहे. यामुळेच विरोधकांच्या पोटात गोळा उठला आहे. त्यातून अपप्रचार सुरू आहे. सव्वा वर्षात मी पाच पिढ्यांचे कमावले म्हणणाऱ्यांनी वर्षानुवर्षे मंत्रिपद भोगल्याने किती कमावले, हे जनतेला सांगावे. 

संबंधित लेख