Dada Bhuse Ajay Bachhav Friendship in Malegaon | Sarkarnama

मालेगावात चर्चा राज्यमंत्री दादा भुसे आणि अजय बच्छावांच्या मैत्रीची 

संपत देवगिरे 
रविवार, 5 ऑगस्ट 2018

बच्छाव यांचे वडील भाऊसाहेब हिरे यांना माननारे. त्यामुळे या सबंध कुटुंबावर काँग्रेसचे संस्कार. अद्यापही वडिलांनतर भाऊ देखील हिरे कुटुंबीयांशीच एकनीष्ठ आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. मात्र, अजय बच्छाव यांना हे राजकीय बंधन कधी मैत्रीच्या आड आले नाही. अगदी प्रत्येक सामाजिक उपक्रम, राजकीय, व्यक्तीगत, कौटुंबिक कार्यक्रमांत हे दोघेही एकमेकांच्या हातात हात घालुन बरोबर असतात.

नाशिक : ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे आणि मालेगावचे बांधकाम व्यवसायिक अजय बच्छाव हे मालेगावमधले 'जय आणि विरु' ठरावेत अशी जोडी आहे. बच्छाव यांचे घर राष्ट्रवादी काँग्रेसला माननारे तर भुसे शिवसेनेचे मात्र गेली पंचवीस वर्षे राजकारणाच्या वाद, विवाद कधीही त्यांच्या मैत्रीत अंतर निर्माण करु शकले नाहीत. उलट ही मैत्री अधिक घट्टच होत गेली आहे, हे दोघेही अभिमानाने सांगतात. 

दादा भुसे सध्या राज्यमंत्री आहेत. गेले तीन टर्म ते शिवसेनेचे आमदार म्हणून मालेगाव बाह्य मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. तीस वर्षांपूर्वी ते पाटबंधारे विभागात नोकरीस होते. शहापुर (ठाणे) येथे त्यांची नेमणूक होती. मात्र त्यांचा पीड नोकरीपेक्षा सामाजिक कामात रस घेणारा होता. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि मालेगावला आपल्या गावी आले. पुढे काय? असा प्रश्‍न निर्माण झाला होता. तेव्हा त्यांची भेट अभियंता अजय बच्छाव यांच्याशी झाली. त्यांनी भागीदारीत एक प्लॉट घेऊन व्यवसाय सुरु केला. त्यातुन हे संबंध लगेचच मैत्रीत रुपांतरीत झाले. 

बच्छाव यांचे वडील भाऊसाहेब हिरे यांना माननारे. त्यामुळे या सबंध कुटुंबावर काँग्रेसचे संस्कार. अद्यापही वडिलांनतर भाऊ देखील हिरे कुटुंबीयांशीच एकनीष्ठ आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. मात्र, अजय बच्छाव यांना हे राजकीय बंधन कधी मैत्रीच्या आड आले नाही. अगदी प्रत्येक सामाजिक उपक्रम, राजकीय, व्यक्तीगत, कौटुंबिक कार्यक्रमांत हे दोघेही एकमेकांच्या हातात हात घालुन बरोबर असतात.

बच्छाव हे राजकारणापासुन लांबच असतात. मात्र मित्र म्हणून त्याला दादा भुसे हे अपवाद असतात. दादा भुसे यांना शिवसेनेतर्फे राज्यमंत्री पदाची संधी मिळाली. तेव्हा शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांच्या भेटीलाही भुसे यांनी पक्षाच्या नेत्यांसमवेत बच्छाव यांनाच नेले. राजभवन वर शपथविधी नंतर त्यांच्या गळ्यात पडून शुभेच्छा देणारेही बच्छाव हेच पहिले होते. 

गेल्या पंचवीस वर्षात आयुष्यात अनेक वळणे आली. आज जागतिक मैत्रीदिन असल्याने त्यांनी या गोष्टींना उजाळा दिला. आपल्या या राजकारणापलिकडच्या मैत्रीबाबत अजय बच्छाव म्हणाले, ''आमच्या मैत्रीत कुटुंबाचे राजकारण कधीच आड आले नाही. मी कधीच कोणत्या राजकीय व्यासपीठावर गेलो नाही. मात्र दादा त्याला अपवाद आहेत. त्यांच्या प्रत्येक निवडणूकीत न सांगताच पडेल त्या जबाबदाऱ्या आम्ही पार पाडत असतो. कधीही आयुष्यात चाचपडलो तर दोघांनीही एकमेकांना दिशा दाखवली आहे. आधी मी या मीत्राचाच सल्ला घेतो. असा दिलदार मित्र मिळाला हे सुख, समाधान अन्‌ नशीब प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. त्यादृष्टीने मी भाग्यवान समजतो.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख