dabholkar amol kale pistol | Sarkarnama

पिस्तूलचा वापर सुदर्शन चक्रासारखा, अमोल काळेची ताकीद

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

बंगळूर : महाराष्ट्रातील रोहित रेगे याच्या घरी सापडलेली 7.65 एमएम पिस्तूल तपासकार्यातील एक महत्वाचे पाऊल असल्याचे मत गौरी लंकेश हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या कर्नाटक एसआयटी अधिकाऱ्यांचे आहे. काम फत्ते झाल्यानंतर पिस्तूल आपल्या हाती आली पाहिजे, अशी सक्त ताकीद अमोल काळेने सर्वांना दिली होती. 

सुदर्शन चक्राप्रमाणे त्याने पिस्तूलचा वापर केला. गौरी लंकेश हत्येसाठीही याच पिस्तूलचा वापर झाला का, याचा शोध एसआयटी अधिकारी घेत आहेत.

नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या आरोपावरून अटक केलेला सचिन अंदुरेकडे गौरी हत्या प्रकरणातील संशयित अमोल काळेने पिस्तूल दिल्याचा आरोप आहे. "पिस्तूल फार महत्वाची आहे. सावधगिरीने जपून ठेव.', असे काळेने पिस्तूल देताना सांगितल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. त्यामागचे गूढ काय, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न एसआयटी अधिकारी करत आहेत.

दाभोलकरांच्या हत्येनंतर पिस्तूल अमोल काळेकडे परत करण्यात आली होती. एका वर्षानंतर तीच पिस्तूल पुन्हा सचिन अंदुरेच्या हाती देण्यात आली. वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर यांना अटक केल्यानंतर अंदुरेकडे असलेली पिस्तूल एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित करण्यात आली. 

शेवटी ती रोहित रेगेच्या घरी सापडली. ती आता न्यायवैधक प्रयोगशाळेत पाठविली आहे. हीच पिस्तूल दाभोलकर यांच्या हत्येनंतर पानसरेंच्या हत्येपर्यंत फिरत राहिल्याची माहिती एसआयटीला मिळाली आहे.

अहवालाची प्रतीक्षा
दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येनंतर पिस्तूल काळेच्या हाती आली होती. आता एम. एम. कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्येसाठीही हीच पिस्तूल वापरली होती का? 2015 नंतर या पिस्तुलाचा वापर कुठे करण्यात आला, याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न एसआयटी करत आहे. त्यासाठी एफएसएल अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.  

संबंधित लेख