शरद पवार ट्रकमधून खाली उतरले आणि जनसागर लोटला! 

शरद पवार ट्रकमधून खाली उतरले आणि जनसागर लोटला! 

अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आंदोलन झाले होते. त्यावेळी शेतकरी दिंड्या निघाल्या होत्या. आम्हीही शेतकरी दिंडीच्या माध्यमातून नागपूरला गेलो होतो. त्यावेळी अंतुले यांनी शरद पवार यांना अडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली होती. या दरम्यान नागपूरच्या झाशीच्या राणी चौकात शरद पवार व एस. एम. जोशी ट्रकमधून खाली उतरले. कडक पोलिस बंदोबस्त असतानाही ते थेट उतरून चालू लागले. त्यावेळी त्यांच्यामागे जनसागर लोटला. खरे तर त्या वेळी पवार यांची लोकप्रियता दिसून आली. इतर कार्यकर्ते जीवाची पर्वा न करता पवार यांच्या मागे उभे होते. त्यानंतर शरद पवार यांच्याबरोबरच एस. एम. जोशी यांनाही अटक झाली होती. पवार यांची लोकप्रिता पाहून आम्ही अक्षरशः भारावून गेलो होतो. 

शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला देण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी आम्ही मुंबईला होतो. एका बैठकीत सर्व नेत्यांनी शरद पवार यांना हा निर्णय तुर्त पुढे ढकलण्याची विनंती केली. कारण लवकरच निवडणुका लागणार होत्या. नामांतर झाले तर औरंगाबादमध्ये शिवसेनेला फायदा होईल. मराठवाड्यात कॉग्रेसच्या सत्तेला धोका होईल, असे आम्ही सुचविले. मात्र शरद पवार यांनी सांगितले, की सत्ता गेली तरी चालेल, पण महामानवाचे नाव विद्यापीठाला मिळते आहे, ते टाळायचे नाही. या प्रश्नापुढे सत्ता हा गौण विषय आहे. पुढे तसेच झाले. मराठवाड्यात विशेषतः औरंगाबादमध्ये शिवसेनेला फायदा झाला. कॉग्रेसला जास्त जागा मिळू शकल्या नाहीत. सत्ता गेली. या वरून पवार यांचा समाजाविषयी असलेला दृष्टीकोन स्पष्ट होतो. तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. 

                                      (शब्दांकन: मुरलीधर कराळे, नगर) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com