डी. बी. देसाई कोल्हापूरचे जिल्हाधिकारी ,सुनील केंद्रेकर औरंगाबादचे विभागीय आयुक्‍त

राज्य सरकारने तब्बल तेरा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सोलापूर महापालिकेचे आयुक्‍त अविनाश ढाकणे आता जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून काम बघतील.
डी. बी. देसाई कोल्हापूरचे जिल्हाधिकारी ,सुनील केंद्रेकर औरंगाबादचे विभागीय आयुक्‍त

मुंबई:  राज्य सरकारने आज प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. औरंगाबादचे विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर यांची राज्याच्या युवक व क्रीडा आयुक्‍तपदी बदली झाली असून, त्यांच्या जागी सुनील केंद्रेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारने तब्बल तेरा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सोलापूर महापालिकेचे आयुक्‍त अविनाश ढाकणे आता जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून काम बघतील. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून ठसा उमटवणाऱ्या विवेक भीमनवार यांना वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून पाठविण्यात येणार आहे. या पदावरील शैलेश नवल यांना अमरावतीचे जिल्हाधिकारी करण्यात आले आहे.

पशुसंवर्धन आयुक्‍त, पुणे कांतीलाल उमप आता 'मेडा'चे महासंचालक म्हणून काम बघतील. जी. बी. पाटील यांना कृषी विभागात सहसचिव म्हणून नेमण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन महसूल व वन विभागाचे डी. बी. देसाई आता कोल्हापूरचे जिल्हाधिकारी असतील.

 अतिरिक्‍त आदिवासी आयुक्‍त एच. मोडक यांना वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नेमण्यात आले आहे. स्मार्ट सिटी सोलापूरसाठी प्रयत्न करणारे अविनाश ढाकणे आता जळगाव या भाजपच्या अंतर्गत राजकारणात महत्त्वाचा विषय ठरलेल्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील. तळोदा नंदूरबार येथील प्रकल्पाधिकारी विनय गौडा जीसी आता नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून काम बघतील.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com