Criticism on Marathwada Leaders in Literary Festival | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले
राहुल गांधी पिछाडीवरून पुन्हा आघाडीवर
पुणे : पहिल्या फेरित एनडीए तीनशे जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
रायबरेलीत सोनिया गांधी आघाडीवर आहेत
दक्षिण मध्य मुंबईत पहिल्या फेरीत शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे आघाडीवर...

मराठवाड्यातील नेते अशोकाच्या झाडासारखे - ऋषिकेश कांबळे यांची टीका

सुशांत सांगवे
सोमवार, 24 डिसेंबर 2018

''मराठवाड्याला चांगले राजकीय नेतृत्वच नाही. मराठवाड्यातील नेते प्रचंड उंचीचे आहेत. पण ते अशोकाच्या झाडासारखे आहेत. ते एकटेच वाढत गेले. त्यांना डेरेदार होता आले नाही," अशा शब्दांत संमेलनाध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी मराठवाड्यातील राजकारण्यांवर जोरदार हल्ला चढवला.

उदगीर : ''मराठवाड्याला चांगले राजकीय नेतृत्वच नाही. मराठवाड्यातील नेते प्रचंड उंचीचे आहेत. पण ते अशोकाच्या झाडासारखे आहेत. ते एकटेच वाढत गेले. त्यांना डेरेदार होता आले नाही," अशा शब्दांत संमेलनाध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी मराठवाड्यातील राजकारण्यांवर जोरदार हल्ला चढवला.

मराठवाडा साहित्य परिषद आणि परिषदेच्या उदगीर शाखेच्या वतीने आयोजित 40व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात समाज व्यवस्था, राज्यकर्ते, लेखक यांना उद्देशून कांबळे यांनी परखड विचार मांडले. साहित्यिक डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन झाले. शिवाय, मराठवाड्यातील साहित्य-संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या 'सुंबरान' या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. रंगनाथ तिवारी, खासदार डॉ. सुनील गायकवाड, माहिती आयुक्त दिलीप धारुरकर, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, स्वागताध्यक्ष रामचंद्र तिरुके, शिक्षक आमदार विक्रम काळे उपस्थित होते.

कांबळे म्हणाले, "मराठवाड्यातील नेत्यांनी मतदार संघापुरता विकास केला. मराठवाड्याचा विचार केला नाही. गोविंदभाई स्रोफ किंवा डॉ. रफिक झकेरीया यांच्यासारखा नेता येथे झाला नाही. पण नव्या पिढीने तसे होण्याचा प्रयत्न करावा." आपल्या आजूबाजूचे सामाजिक सांस्कृतिक, राजकीय पर्यावरण चिंतीत करणारे आहे. विचारवंतांचे होणारे खून, कपड्यावर- खाण्यावर घातले जाणारे निर्बंध, जात धर्माच्या नावावरून पसरवला जाणारा तेढ ही लोकशाही नसून दबक्या पावलांनी येणारी हुकूमशाही आहे. हुकूमशाहीचे रुप पुतना मावशीसारखी असते. ती आकर्षक वाटते; पण विष ओकते, असेही ते म्हणाले.

व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सुरु
डॉ. कांबळे म्हणाले, "आपल्या आजूबाजूला भय नाही, असे वारंवार सांगितले जात आहे. मग इतके भय कंपित वातावरण का घोंगावत आहे, देशाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडल्यासारखे का वाटत आहे, अनेक समाजसमूहाला असुरक्षित का वाटत आहे, याचा नीट विचार झाला पाहिजे. माणूस संपविण्याचे कटकारस्थान चालू आहे. माणसं सज्ञान होऊ नयेत, ती अंधश्रद्धेच्या कोंडवाड्यात राहावीत याचे प्रयत्न सुरु आहेत. व्यक्ती स्वातंत्र्याची मोठ्या प्रमाणात गळचेपी सुरु आहे. हे प्रकारे धर्मांधतेच्या तीक्ष्ण भाल्याने केले जात असतील तर धर्माचाही पुनर्विचार करायला हवा."

संबंधित लेख