Criminals should fear police : Krishnakant Upadhyay | Sarkarnama

गुन्हेगारावर पोलिसांचा वचक असलाच पाहिजे : कृष्णकांत उपाध्याय

गणेश पांडे
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018


पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांचे शिक्षण बी.टेक झालेले आहे. शिक्षण पुर्ण केल्यानंतर खासगी कंपनीत अभियंता त्यांनी काम केले आहे. 2010 मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन सहाय्यक संचालक म्हणून काम केले. त्यानंतर ते 2011 मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून त्यांची भारतीय पोलिस सेवेत अधिकारी म्हणून निवड झाली. 2012 सालचे ते आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी अक्कलकोट (जि.सोलापूर), सांगली येथे अप्पर पोलिस अधिक्षक, नागपूर (शहर) पोलिस उपायुक्त म्हणून काम केले आहे.

परभणी  : सर्वसामान्य नागरीकांच्या सेवेसाठी पोलिस सदैव तत्पर असतात. जिल्ह्यातील कायदा व सुवव्यस्था कायम अबाधित ठेवून गुन्हेगारी प्रवृतीला संपविण्यास आपले प्राधान्य असेल, अशी माहिती नुतन पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी गुरुवारी (ता.2) दिली. 

श्री. उपाध्याय यांनी गुरुवारी दुपारी त्यांच्या पदाची सुत्रे स्विकारली.मावळते पोलिस अधिक्षक दिलीप झळके यांची अमरावती येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नागपूर शहराचे पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांची परभणी येथील पोलिस अधिक्षक म्हणून नियुक्ती झाली. गुरुवारी (ता.2) दुपारी त्यांनी त्यांच्या पदाची सुत्रे स्विकारली.

' सरकारनामा'शी ते म्हणाले, परभणी आल्यानंतर मी उत्साही आहे. येथील सर्वसामान्यांचा सकारात्मक सहयोग आवश्यक आहे. सर्वसामान्य व्यक्तीचा सहयोग भेटला तर पोलिस व्यवस्था सदृढ होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील कायदा व सुवव्यस्था कायम चांगली राहण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार आहोत. जनतेला तात्काळ सेवा पुरविण्यासाठी देखील आपण कटीबध्द आहोत. पिडितांना न्याय देऊ शकत नाहीत परंतू त्यांना न्यायालयाच्या दरवाज्यापर्यत पोहचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्यासाठी पोलिस व जनता यातील सुसंवाद घडविण्यावर आपला प्रयत्न असेल. गुन्हेगारीवर वचक राहील अशीच प्रतिमा पोलिसांची असली पाहिजे त्यासाठी देखील आपण प्रयत्न करू . 

 

संबंधित लेख