cpm support maratha community | Sarkarnama

मराठा समाजातील गरजूंना आरक्षण मिळावे, माकपचा पाठिंबा 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

मुंबई : मराठा समाजातील गरजूंना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे यासाठी इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजातील क्रिमी लेयर वगळून आरक्षण मिळावे, या मागणीला मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने आज पाठिंबा जाहीर केला.

मराठा समाजातील आंदोलकांनी संयम पाळून शांततेच्या मार्गाने आंदोलन चालवावे असे आवाहनही पक्षाने केले आहे. वाढत्या बेरोजगारीचा भस्मासुर, शिक्षणाचे बाजारीकरण, शेतीतील या अरिष्टामुळे महाराष्ट्रात गेल्या 25 वर्षांत सुमारे 70 हजार शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करावी लागली आहे. 

या आत्महत्यांत मराठा शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असून ओबीसी शेतकऱ्यांची संख्या त्याच्या खालोखाल आहे. तसेच इतर सर्व जातिधर्मांतील शेतकऱ्यांचा अशा आत्महत्यांत समावेश आहे. आरक्षणाची मागणी तीव्र होण्यामागे, शेतीतील हे अरिष्ट एक प्रमुख कारण आहे, याची दखल धोरणकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन माकपने केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख