cpi claim on parner assembly seat in mahahaaghadi | Sarkarnama

काँग्रेस-राष्ट्रवादी 'पारनेर विधानसभा' भारतीय कम्युनिस्ट पक्षाला सोडणार?

मार्तंड बुचुडे
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

अॅड. आझाद ठुबे यांनी शक्तीप्रदर्शन करत आपण पारनेर विधानसभेचे उमेदवार आहोत, हे दाखविण्याची संधी साधली.

पारनेर (नगर) : शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत आझाद मैदानावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने एल्गार पुकारण्यात आला होता. या मोर्चाच्या निमित्ताने माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. आझाद ठुबे यांनी शक्तीप्रदर्शन करत आपण पारनेर विधानसभेचे उमेदवार आहोत, हे दाखविण्याची संधी साधली.

या मोर्चास पक्षाचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य भालचंद्र कांगो, कॉ. सुभाष लांडे, अॅड. आझाद ठुबे, स्मिता पानसरे, कॉ. बन्सीभाऊ सातपुते, कॉ. संतोष खोडदे, कॉ. शांताराम वाळुंज कॉ. एल .एम डांगे यांच्यासह हजारो कम्युनिस्ट कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी पक्षाचे राज्याचे सेक्रेटरी तुकाराम भसले यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय कम्युनिस्ट पक्षाबरोबर आघाडी केली तर आम्ही तीन जागा मागणार आहोत. त्यात पारनेरची जागा प्राधान्याने घेणार. दोन्ही पक्ष ही जागा सोडण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या मतदार संघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाल्याने ही जागा सोडण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

संबंधित लेख