court rejects bail application of ramesh adhav | Sarkarnama

राष्ट्रवादीचा वडगाव शेरी कार्याध्यक्ष रमेश आढावचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

पुणे : जबरदस्तीने जमिनीचा ताबा घेतल्याप्रकरणी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काॅग्रेसचा कार्याध्यक्ष रमेश आढाव याच्यासह त्याचा भाऊ शाम आढाव, बांधकाम व्यावसायिक अरविंद जैन, मोईन कुरेशी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळला. 

पुणे : जबरदस्तीने जमिनीचा ताबा घेतल्याप्रकरणी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काॅग्रेसचा कार्याध्यक्ष रमेश आढाव याच्यासह त्याचा भाऊ शाम आढाव, बांधकाम व्यावसायिक अरविंद जैन, मोईन कुरेशी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळला. 

भाडेकरूला जिवे मारण्याची धकमी देत, दमदाटी करून, त्याच्याकडील जागा बळजबरीने हिसकावून घेतल्याबद्दल संबंधितांवर १७ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेले काही दिवस आरोपींच्या जामीनासंबंधी न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी आज हा अर्ज फेटाळला. आरोपींनी या निकालाच्या विरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत मागितली होती. ही विनंती देखील न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे संबंधितांना केव्हाही अटक होऊ शकते.

विकास भीमसेन नाणेकर यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. येरवडा पोलिस सुरवातीला हा गुन्हा दाखल करण्यासाठी दाद देत नव्हते. त्यामुळे त्यांनी थेट पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानंतर यंत्रणा हलली आणि गुन्हा दाखल झाला होता. 

नाणेकर यांचे रामवाडी येथे गेल्या चाळीस वर्षांपासून रामवाडी येथे भाड्याने दुकान व मोकळी जागा होती. या जागेवर बेकायदा कब्जा केल्याची तक्रार आढाव यांच्याविरोधात करण्यात आली होती. त्यासाठी नाणेकर यांचा पुतण्या भूषण यास पिस्तुलचा धाक दाखवून धमकाविण्यात आल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

आढाव हे या आधी काॅंग्रेसमध्ये होते. त्यांनी महापालिकेच्या चार निवडणुका लढविल्या होत्या. त्यांची नुकतीच राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदावर नियुक्ती झाली होती. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतरही त्यांना तात्काळ अटक होणार का, याकडे आता लक्ष आहे. 

संबंधित लेख