Court grants permission to Ramprasad Bordikar to enter Parbhani city | Sarkarnama

 जिल्हा बॅंकेच्या विमा घोटाळ्यात रामप्रसाद बोर्डीकर यांच्यावरील परभणी शहर बंदी उठली 

गणेश पांडे 
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

गेल्या काही वर्षापासून रामप्रसाद बोर्डीकर यांना परभणी शहरात बंदी घालण्यात आली होती. परभणी शहरात आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात त्यांना प्रवेश करता येत नव्हता .

परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या विमा घोटाळ्याचा आरोप असलेले जिंतूरचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यावर घातलेली परभणी शहर बंदी उठविण्यात आली आहे.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शेतकरी विमा घोटाळ्यात माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यावर आरोप आहेत. या प्रकरणाचा निकाल अद्यापही न्यायालयात प्रविष्ठ आहे. गेल्या काही वर्षापासून रामप्रसाद बोर्डीकर यांना परभणी शहरात बंदी घालण्यात आली होती.

परभणी शहरात आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात त्यांना प्रवेश करता येत नव्हता . त्यामुळे ते गेल्या काही दिवसापासून शहराच्या  राजकारणात सक्रीय नव्हते.  

पाच दिवसापूर्वी त्यांना परभणी शहरात जाण्याची परवनगी न्यायालयाकडून मिळाली आहे. त्यामुळे बोर्डीकरांना परभणी येता आले आहे . रामप्रसाद बोर्डीकर प्रदीर्घ काळ काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत मात्र सध्या ते भाजपमध्ये दाखल झालेले आहेत . सध्या ते भाजपच्या 'मेरा बुथ सबसे मजबूत' अभियानात सक्रिय झाले आहेत .  
 

संबंधित लेख