Corporator Presented Spray Balm to Municipal Commissioner | Sarkarnama

खड्यांमुळे होणाऱ्या वेदनेसाठी उल्हासनगर आयुक्तांना स्प्रे-बामची गिफ्ट

दिनेश गोगी
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

शहराच्या विविध भागाव्यतिरिक्त प्रमुख चौकातही खड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने त्याचे पडसात आज उल्हासनगर पालिकेच्या महासभेत उमटले आहे.या खड्यांमुळे नागरिकांना कंबरदुखी,गुडघेदुखी या वेदनांनी ग्रासले असून तुम्हाला वेदना होतच नाही काय?असा सवाल करून नगरसेवक मनोज लासी यांनी आयुक्त गणेश पाटील यांना चक्क रिलीफस्प्रे व झंडू बामची गिफ्ट महासभेतच देऊन सर्वांनाच अचंबित करून सोडले.

उल्हासनगर : शहराच्या विविध भागाव्यतिरिक्त प्रमुख चौकातही खड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने त्याचे पडसात आज उल्हासनगर पालिकेच्या महासभेत उमटले आहे.या खड्यांमुळे नागरिकांना कंबरदुखी,गुडघेदुखी या वेदनांनी ग्रासले असून तुम्हाला वेदना होतच नाही काय?असा सवाल करून नगरसेवक मनोज लासी यांनी आयुक्त गणेश पाटील यांना चक्क रिलीफस्प्रे व झंडू बामची गिफ्ट महासभेतच देऊन सर्वांनाच अचंबित करून सोडले. लासी यांच्या या पवित्र्याला सर्व पक्षीय नगरसेवकांनी ओरड करून साथ दिल्याने बाप्पाच्या आगमनापूर्वी खड्डे हद्दपार केले जातील असे आश्वासन पाटील यांनी दिले.

पावसाळा जवळपास संपत आल्याने अनेक शहरातील खड्डे भरताना डांबरीकरण करण्यात आलेले आहे.आपल्या शहराची खड्यांनी दुरावस्था केली असून चारचाकी वाहन,रिक्षा मधून व मोटरसायकलरून प्रवास करणे जिकरीचे ठरू लागले आहे.खड्यांत गाड्या धाडनिशी आपटत असल्याने कंबरदुखी,गुडघेदुखी,मानेच्या त्रासाने नागरिक बेजार झाले आहेत. त्यांना त्यासाठी रिलीफ स्प्रे, झंडू बामचा आधार घ्यावा लागत आहे. 

यावर मनोज लासी यांनी लक्ष वेधल्यावर महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे,शिवसेना नगरसेवक राजेंद्र चौधरी, सुनील सुर्वे, शेखर यादव, अरुण आशान, सभागृह नेते जमनादास पुरस्वानी,भगवान भालेराव आदी सर्व पक्षीय नगरसेवकांनी खड्यांवरून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. लासी यांनी आयुक्त गणेश पाटील यांना रिलीफ स्प्रे व झंडू बाम गिफ्ट दिल्यावर बाप्पाच्या आगमनापूर्वी खड्डे हद्दपार करून रोड चकाचक केले जातील असे आश्वासन पाटील यांनी दिले.

खड्यांच्या कंत्राटची चौकशी समिती

दरम्यान 14 करोड रुपयांचा खड्डे भरण्याचा कंत्राट देण्यात आलेले असून त्यानुसार काम होत नसल्याने त्यासाठी चौकशी समिती महासभेत नेमण्यात आली. त्यात महापौर मीना आयलानी, आयुक्त गणेश पाटील, उपमहापौर जीवन इदनानी,सभागृहनेते जमनादास पुरस्वानी,विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, नगरसेवक मनोज लासी, राजेश वधारिया यांचा समावेश आहे.
 

संबंधित लेख