वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीनवर 'एमपीडीए' कायद्या अंतर्गत कारवाई

वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीनवर 'एमपीडीए' कायद्या अंतर्गत कारवाई

औरंगाबाद: एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याच्यावर घातक कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (एमपीडीए) कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार मतीन याची एक वर्षासाठी हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

महापालिका सभागृहात 17 ऑगस्ट रोजी  माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेला विरोध दर्शवत एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याने वाद ओढावून घेतला होता. त्याच्यावर या प्रकरणात व पूर्वीच्या अनेक प्रकरणात गुन्हे दाखल आहेत.

 कायदा व सुरक्षेच्या दृष्टीनने औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयाकडून  ही कारवाई करण्यात आली आहे. एमपीडीए
कायद्या अंतर्गत ही कारवाई झाल्यामुळे एक वर्षभर मतीनला जामिन सुद्धा मिळणार नाही.या कायद्यानुसार पोलिसांना  स्थानबद्ध व्यक्तीला  जामिना शिवाय किमान तीन महिने आणि जास्तीत जास्त एक वर्ष तुरुंगात  ठेवण्याची मुभा आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com