नगरसेवकांच्या मानधनात दुप्पटीने वाढ 

नगरसेवकांच्या मानधनात दुप्पटीने वाढ 

औरंगाबाद ः राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी (ता. 15) घेतला आहे. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचे मानधन दुपटीपेक्षा अधिक वाढवून तब्बल 25 हजार रुपये; तर त्या खालोखाल "अ', "ब', "क' व ड वर्ग महापालिकेतील नगरसेवकांना मानधन मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक मानधनवाढीचा पाठपुरावा सुरू होता. 


वाढत्या महागाईनुसार नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, असे ठराव राज्यातील महानगरपालिकांनी मंजूर करून वेळोवेळी शासनाकडे पाठविले होते. सर्वांत श्रीमंत समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या मानधनात 2012 मध्ये दहा हजार रुपयांवरून 25 हजार एवढी वाढ करण्याचा ठराव घेतला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना त्यानुसार पत्रदेखील पाठविण्यात आले होते; मात्र नगरसेवकांच्या मानधनात वाढ झालेली नव्हती. दरम्यान, नुकत्याच झालेल्या महापौरांच्या परिषदेतसुद्धा याबाबतचा ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार राज्य शासनाने राज्यातील 26 महानगरपालिकांमधील नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना सर्वाधिक 25 हजार रुपये मानधन मिळणार आहे. 

औरंगाबादेत अडीच हजारांची वाढ 
औरंगाबाद महापालिकेत निवडून आलेले 115, तर स्वीकृत पाच असे 120 नगरसेवक असून, त्यांना सात हजार 500 रुपये एवढे मानधन देण्यात येते. गेल्या दहा वर्षांत त्यात वाढ करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे मानधनात वाढ करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत घेऊन तो शासनाकडे पाठविण्यात आला होता. औरंगाबाद महापालिका "ड' वर्गात असून, त्यानुसार नगरसेवकांना आता दहा हजार रुपये मानधन मिळणार आहे. याव्यतिरिक्त एका बैठकीचा शंभर रुपये असा भत्ता नगरसेवकांना देण्यात येतो. 

असे असेल वाढीव मानधन 
"अ' प्लसवर्ग 25 हजार 
"अ' वर्ग 20 हजार 
"ब' वर्ग 15 हजार 
"क' व "ड' वर्ग 10 हजार 
 

राज्यातील महापालिका 
अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, भिवंडी-निजामपूर,चंद्रपूर,धुळे,जळगाव,कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर,लातूर,मालेगाव, मिरा-भाईंदर, नागपूर,नांदेड-वाघाळा, नाशिक,नवी मुंबई, पनवेल, परभणी,पिंपरी-चिंचवड, पुणे,सांगली-मिरज-कुपवाड,सोलापूर, ठाणे,उल्हासनगर, वसई- विरार 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com