conversation between sadabhu khot and rajesh chavhan | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

'माझ्याकडे तुमचा मोबाईल नंबर नाही'... हे ऐकताच सदाभाऊ तहसिलदारांवर संतापले!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

तुम्ही वशिल्याने येथे आला आहात काय, असा प्रश्‍न सदाभाऊंनी केला.

सातारा : टंचाईबाबत माहिती घेण्यासाठी स्वत: मोबाईलवरून व मंत्रालयातून केलेला फोन उचलला नाही म्हणून कऱ्हाडचे तहसिलदार राजेश चव्हाण यांना सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी झापडले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजवा, त्यांची एक इनक्रिमेंट थांबवा, अशी सूचना त्यांनी जिल्हाधिकार श्‍वेता सिंघल यांना केली. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात जिल्हा टंचाई आढावा बैठक आज सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थित झाली. यावेळी माणचे आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हापरिषदेचे सीईओ कैलास शिंदे, रोजगार हमीचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर उपस्थित होते. 

बैठकीत तालुकानिहाय टंचाईची नेमकी काय परिस्थिती आहे, याची माहिती सहपालकमंत्री सदाभाऊ खोत घेत होते. यावेळी कऱ्हाडचे तहसिलदार कोण आहेत, अशी विचारणा सदाभाऊंनी केली. त्यावर राजेश चव्हाण उभे राहिले. त्यांना तुम्ही माझा फोन का उचलत नाही,असा प्रश्‍न श्री. खोत यांनी केला. त्यावर श्री.चव्हाण यांनी माझ्याकडे तुमचा मोबाईल नंबर नाही, असे सांगितले. यावर सदाभाऊ संतप्त झाले. ते म्हणाले, मोबाईल उचलत नाही, तसेच मंत्रालयातून दूरध्वनीवरून केलेलाही फोन ही तुम्ही उचलत नाही. नेमके काय कारण आहे. जिल्हाधिकारी मॅडम फोन उचलतात तुम्ही कोणाचाच फोन उचलत नाही, असे म्हणत यांना कारणे दाखवा नोटीस बजवा तसेच त्यांची एक इनक्रिमेंट कमी करण्याची नोटीस काढा, अशी सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. 

तुम्ही वशिल्याने येथे आला आहात काय, असा प्रश्‍न केला. अधिवेशन तोंडावर आहे, दुष्काळ व टंचाईची माहिती मुख्यमंत्र्यांना द्यावी लागते. त्यामुळे आम्हाला तुमच्याशी मोबाईलवरून संपर्क करून माहिती घ्यावी लागते. मी टंचाई परिस्थितीसाठी मुंबईहून साताऱ्यात बैठकीला आलो आहे. मला काही काम नाही का, असा प्रश्‍न त्यांनी श्री. चव्हाण यांच्याकडे पाहत केला. या प्रकारावर तहसिलदार राजेश चव्हाण यांची मात्र, गाळण उडाली. त्यांनी कोणतेही उत्तर न देता गप्प बसणे पसंत केले. यावर जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी कोणीही अधिकाऱ्यांनी मोबाईल बंद ठेऊ नये. दररोज फोन सुरू ठेवावा. तसेच अधिवेशनाच्या काळात सकाळी नऊ ते अकरा मोबाईल बंद ठेऊ नये, अशी सूचना केली.  

संबंधित लेख