contry thanks hall rahul gandhi | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

देश "हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स'चा ऋणी, राहुल यांचा मोदींना चिमटा

वृत्तसंस्था
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

बंगळूर : हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स लिमिटेड (एचएएल) ही भारताची "धोरणात्मक संपत्ती' असून देश या कंपनीचा ऋणी आहे, असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज म्हणाले. राफेल करारावरून राहुल यांनी मोदी सरकारला टीकेचे लक्ष्य केले असून आजचे विधान हा त्याचाच भाग होता. 

राहुल यांनी आज "एचएएल'च्या आजी-माजी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. "एचएएलने देशासाठी प्रचंड योगदान दिले आहे. देशाचे संरक्षण केल्याबद्दल आणि वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण केल्याबद्दल देश त्यांचा ऋणी आहे. ही कंपनी साधीसुधी नसून हवाई क्षेत्रातील भारताची धोरणात्मक संपत्ती आहे,' असे राहुल म्हणाले. 

या कंपनीला अधिक परिणामकारक कसे बनवता येईल, याबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा केली, जेणेकरून आम्ही सत्तेत आल्यावर अधिक आक्रमक धोरणे राबवित त्याची अंमलबजावणी करता येईल, असे राहुल यांनी सांगितले. मोदी सरकारने लढाऊ विमानांसाठी एचएएलकडे दुर्लक्ष करत फ्रान्सच्या राफेलबरोबर करार केल्याचा कॉंग्रेसचा आरोप आहे.

संबंधित लेख