constabale dead | Sarkarnama

कायगांवमध्ये बंदोबस्तावरील पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने मृत्यू

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

औरंगाबाद : कायगांव टोका येथील गोदापात्रात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या अंत्यसंस्कारानंतर तेथील परिस्थीती चिघळली आहे. त्याठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र बंदोबस्ताला असलेले कॉन्स्टेबल श्‍याम पाटगांवकर यांचा हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने दुर्दैवी मृत्यू झाला. काकासाहेब शिंदे या तरुणाने कायगांव टोका येथे आंदोलना दरम्यान गोदावरी पात्रात उडी घेतली होती. या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आज कायगांव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

औरंगाबाद : कायगांव टोका येथील गोदापात्रात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या अंत्यसंस्कारानंतर तेथील परिस्थीती चिघळली आहे. त्याठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र बंदोबस्ताला असलेले कॉन्स्टेबल श्‍याम पाटगांवकर यांचा हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने दुर्दैवी मृत्यू झाला. काकासाहेब शिंदे या तरुणाने कायगांव टोका येथे आंदोलना दरम्यान गोदावरी पात्रात उडी घेतली होती. या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आज कायगांव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले आणि त्यांनी औरंगाबाद-नगर-पुणे महामार्ग रोखत पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू केले. 

यावेळी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कायगांव येथील बंदोबस्ताच्या कामासाठी पोलीस कॉन्स्टेबल पाटगांवकर हे देखील उस्मानाबाद येथून आले होते. बंदोबस्ताच्या कामात असताना आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते खाली कोसळले. हा प्रकार लक्षात येताच उपस्थितांनी पाटगांवकर यांना तातडीने औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्‍टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. 

संबंधित लेख