congressmen suresh thackrey died | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

काँग्रेसच्या सुरेश ठाकरेंना इतका आनंद झाला की, त्यांना 'हार्ट अॅटॅक' आला!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

गेल्या पंचवीस वर्षापासून ते कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते. 

जळगाव : तीन राज्यांतील निवडणुकीत कॉंग्रेसचा विजय झाल्याच्या अत्यानंदात कॉंग्रेसचे पारोळा येथील माजी तालुकाध्यक्ष सुरेश सुखा ठाकरे (वय 72) राहणार वंजारी (ता.पारोळा) यांचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली.

राज्यस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात कॉंग्रेसचा विजय झाल्याचा निकाल ऐकून कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश ठाकरे यांना आनंद झाला. त्यातच त्यांना हदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. गेल्या पंचवीस वर्षापासून ते कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते. 

संबंधित लेख