Congress Yatra Second Phase from Faizpur | Sarkarnama

काँग्रेस जनजागरण यात्रेचा दुसरा टप्पा फैजपूरपासून 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

जळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक गाव फैजपूर येथून 2 ऑक्‍टोबर रोजी जनजागरण यात्रेचा यात्रेचा दुसरा टप्पा होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह अनेक महत्वाचे नेते मंडळी सहभागी होणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर गावाला ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात फैजपूर येथे कॉंग्रेसचे अधिवेशन घेण्यात आले होते. त्यामुळे काँग्रेसतर्फे जनजागरण यात्राही फैजपूर येथून सुरू करण्यात येणार आहे.

जळगाव : महाराष्ट्र काँग्रेसतर्फे सुरू कोल्हापूर येथून सुरू करण्यात आलेल्या जनजागरण यात्रेचा पहिला टप्पा 8 सप्टेबरला पुणे येथे होत आहे. यात्रेचा दुसरा टप्पा फैजपूर (जि.जळगाव)येथून 2 ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. तसेच गुरूवार (ता.6) रोजी जळगावात आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक गाव फैजपूर येथून 2 ऑक्‍टोबर रोजी जनजागरण यात्रेचा यात्रेचा दुसरा टप्पा होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह अनेक महत्वाचे नेते मंडळी सहभागी होणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर गावाला ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात फैजपूर येथे कॉंग्रेसचे अधिवेशन घेण्यात आले होते. त्यामुळे काँग्रेसतर्फे जनजागरण यात्राही फैजपूर येथून सुरू करण्यात येणार आहे.

यात्रेच्या पूर्वतयारीसाठी प्रदेश सरचिटणीस रामकीसन ओझा गुरूवारी (ता.6) गुरुवारी जळगांव येथे बैठक घेणार आहेत. तसेच याच दिवशी केंद्र सरकार च्या राफेल विमानांच्या खरेदीत केलेल्या महाघोटाळ्याच्या निषेधार्थ जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचे नेतृत्व आमदार यशोमती ठाकूर करणार आहेत. सकाळी 11 वाजता कॉंग्रेस भवन जळगाव येथून निघणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले नंतर संपेल. वरील दोन्ही कार्यक्रमांचे महत्व जाणून घेऊन जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे माजी खासदार, माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश प्रतिनिधी, सर्व ब्लॉक अध्यक्ष,जिल्हा व तालुका फ्रॅंटल व सेल चे अध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद सदस्य, सहकारी संस्थाचे पदाधिकारी, जिल्हा, तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे अवाहन जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी केले आहे.

संबंधित लेख