congress yatra and vidarbha | Sarkarnama

कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा मंगळवारी पश्‍चिम विदर्भात

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 डिसेंबर 2018

अकोला : केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारची कामगिरी जनतेवर अन्याय करणारी आहे. वाढती महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, शेतमालाचे पडलेले भाव, प्रत्येक क्षेत्रात वाढत असलेला भ्रष्ट्राचार, महिलांवरील वाढते अत्याचार, वाढती बेरोजगारी यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. जनतेवर होणारा अन्याय थांबविण्यासाठी सरकारला इशारा देण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत असलेली जनसंघर्ष यात्रा 4 डिसेंबरला पश्‍चिम विदर्भात येणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी दिली. 

कॉंग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेची सुरूवात 4 डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील श्री चिंतामणी गणपतीचे दर्शन घेऊन होणार आहे. सकाळी 11.30 ते 1.30 वाजेपर्यंत यतवमाळ येथे जाहीर सभा, सायंकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत धामणगांव येथे जाहीर सभा, सायंकाळी 7 ते 8.30 वाजेपर्यंत आर्वी येथे जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते 12 वाजेपर्यंत मोर्शी येथे जाहीर सभा, दुपारी 2 ते 3.30 वाजेपर्यंत चांदूर बाजार येथे जाहीर सभा, सायंकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत वलगांव येथे जाहीर सभा, सायंकाळी 6.30 ते 9.30 वाजेपर्यंत अमरावती येथे जाहीर सभा होणार आहे. 

6 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते 12 वाजेपर्यंत दर्यापूर येथे जाहीर सभा, दुपारी 1.30 ते 1.45 वाजेपर्यंत मुर्तिजापूर येथे स्वागत, दुपारी 2.30 ते 4 वाजेपर्यंत कारंजा येथे जाहीर सभा, सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत वाशिम येथे जाहीर सभा होणार आहे. 7 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते 12 वाजेपर्यंत रिसोड येथे जाहीर सभा, दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत अकोला येथे जाहीर सभा, सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत बाळापूर येथे जाहीर सभा, रात्री 8.30 ते 10 वाजेपर्यंत शेगांव येथे श्रींचे दर्शन, डिसेंबर रोजी दुपारी 11 ते 12.30 वाजेपर्यंत अकोट येथे जाहीर सभा, दुपारी 3 ते 4.30 वाजेपर्यंत वरवट बकाल येथे जाहीर सभा, सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत खामगांव येथे जाहीर सभा होणार आहे. 9 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत चिखली येथे अमरावती विभाग जनसंघर्ष यात्रेचा सांगता समारोप होणार आहे. 

या यात्रेत खासदार अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, उपनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, महिला कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा चारूलता टोकस, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव आमदार हर्षवर्धन सपकाळ, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासह संबंधीत जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष, जिल्ह्यातील जेष्ठ नेते, आजी-माजी खासदार, आमदार, जिल्ह्यांचे जिल्हा प्रभारी, जिल्हा सहप्रभारी पदाधिकारी, संबंधित जिल्ह्यातील स्थानिक तसेच प्रदेश पदाधिकारी, सर्व ब्लॉक अध्यक्ष, संबंधीत जिल्ह्यातील आघाडी संघटना, सर्व सेल अध्यक्ष सहभागी होणार असल्याची माहीती प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी दिली. 
 
संबंधित लेख