काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी रक्ताने लिहिलेली पत्रे पाठविली मोदींना : बदला घेण्याची मागणी

काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी रक्ताने लिहिलेली पत्रे पाठविली मोदींना : बदला घेण्याची मागणी

पुणे : स्वत:च्या रक्ताने लिहिलेली पन्नास पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून पुण्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी काश्‍मीरमधील जवानांवर झालेल्या हल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्याचा बदला घेतलाच पाहिजे, असे सांगताना पंतप्रधान मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. 

"माझ्या भावांच्या रक्ताचा सडा सांडलाय, त्या पाकड्यांच्या सुपडा साफ झालाच पाहिजे', अशी भावना पंतप्रधान मोदी यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त करण्यात आले आहे.

पुण्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते अमित बागूल व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वत:च्या रक्ताने लिहिलेले पत्र पंतप्रधान मोदी यांना आज मेलच्या माध्यमातून पाठविले आहे. शिवाय कुरिअरच्या माध्यमातूनही पत्र पाठविण्यात आले आहे.

भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी कोथरूड येथे शिवाजी पुतळ्याजवळ घेतलेल्या श्रद्धांजली सभेला शेकडो नागरीक उपस्थित होते. जंगली महाराज रस्त्यावर झाशी राणी पुतळा चौकात नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांनी घेतलेल्या श्रद्धांजली सभेलादेखील मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते. शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, गणेशोत्सव मंडळांनी चौका-चौकात श्रद्धांजली सभा घेतल्या. तुळशीबाग परिसरातील व्यापारी आणि रहिवाशांनी सायंकाळी काहीवेळ लाईट बंद करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com