congress shivsena akola | Sarkarnama

कॉंग्रेस-शिवसेनेच्या विरोधावर महापौरांची चाणक्‍य निती

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 ऑगस्ट 2017

अकोला : महापालिकेने केलेल्या करवाढीच्या मुद्यावर कॉंग्रेस, शिवसेना, भारिप-बमसंच्या विरोधाला महापौर विजय अग्रवाल यांनी चाणक्‍य निती वापरत विरोधकांची हवाच काढण्याचा प्रकार शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केला. करवाढीच्या निर्णयावर फेरविचार करीत चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवितांना विरोधी पक्षातील काही नगरसेवकांना हरभऱ्याच्या झाडावर चढवित विरोधाची धार बोथट करण्याचा महापौर अग्रवाल यांचा प्रयत्न यशस्वी ठरला. 

अकोला महापालिकेने केलेल्या करवाढीच्या मुद्यावर गेल्या चार महिन्यांपासून राजकीय वातावरण तापले आहे. प्रशासनाने मालमत्ताधारकांना बजावलेल्या करवाढीच्या नोटीसमधील रक्कम अवाजवी असल्याचा आरोप करून ही अकोलेकरांची फसवणुक असल्याचे सांगत याविरुद्ध कॉंग्रेस, शिवसेना, भारिप-बमसं, राष्ट्रवादी कॉंग्रेसने रान पेटविले होते. 
करवाढीच्या निर्णयाबद्दलचा जनतेचा वाढता रोष लक्षात घेता महापौर विजय अग्रवाल यांनी आजच्या सभेत करवाढीच्या निर्णयावर फेरविचार करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून सांगोपांग चर्चाही सभागृह करण्यात आली. मात्र, विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण, शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, कॉंग्रेसचे नगरसेवक डॉ. झिशान हुसेन यांच्यासह अनेक नगरसेवकांनी करवाढीला केलेल्या विरोधावर महापौर अग्रवाल यांनी चाणक्‍य निती वापरत विरोधकांच्या विरोधाची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला. 

नगरसेवक डॉ. झिशान हुसेन यांनी करवाढ कशी अन्यायकारक आहे, हे सभागृहात मुद्देसुदपणे मांडले. त्यावर डॉ. झिशान हुसेन यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवित "डॉक्‍टर साब आप बहोत लॉजिकली बोलते हो, कुछ लोग खाली पहेलवानगिरी दिखाते है ' अशी टिप्पणी करीत महापौरांनी कॉंग्रेस-शिवसेनेच्या काही नगरसेवकांना चिमटा घेतला. केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या मित्रपक्ष शिवसेना महापालिकेत विरोधी बाकावर आहे. मात्र, सेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांना "आप भी हमारे दोस्त है' असे म्हणत करवाढीवर चर्चेतून मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सभागृहात बऱ्याच वेळ या विषयावर चर्चा सुरू असतांना महापौरांनी विरोधकांना केवळ झुलवतच ठेवल्याचे दिसून आले. 

संबंधित लेख