congress sangharsha yatra on 8 january | Sarkarnama

कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला आता 8 जानेवारीचा मुहूर्त 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 डिसेंबर 2018

नागपूर : कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा आता येत्या 8 जानेवारीपासून नागपुरातून सुरू होणार आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या अनुपलब्धतेमुळे ही यात्रा पुढे ढकलण्यात आली होती. 

राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधात कॉंग्रेसने पश्‍चिम महाराष्ट्रातून जनसंघर्ष यात्रेला सुरूवात केली होती. या यात्रेचा अखेरचा टप्पा पूर्व विदर्भात होणार आहे. ही यात्रा 15 डिसेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत होणार होती परंतु प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अनुपलब्धतेमुळे ही यात्रा पुढे ढकलण्यात आली होती. 

जनसंघर्ष यात्रेचा नवा कार्यक्रम आता जाहीर करण्यात आला आहे. नव्या कार्यक्रमानुसार आता येत्या 8 जानेवारी ते 12 जानेवारीपर्यंत जनसंघर्ष यात्रा होणार आहे. यावेळी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित राहणार आहेत. 

नागपुरात दीक्षाभूमी, ताजुद्दीनबाबांचा दर्गा येथे अभिवादन करून या यात्रेची सुरूवात होणार आहे. पूर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा या जिल्ह्यातून ही जनसंघर्ष यात्रा फिरणार आहे.

छत्तीसगड व मध्यप्रदेशात कॉंग्रेसला यश मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याचा दावा नागपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी केला आहे. 

या राज्य सरकारच्या विरोधात शेतकरी, युवा, व्यापाऱ्यांमध्ये असलेल्या असंतोषामुळे या यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा केला आहे. या यात्रेत काही जुन्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पक्षात परत प्रवेश देण्यात येईल. परंतु त्यांची नावे मात्र मुळक यांनी उघड केली नाही. 

संबंधित लेख