congress press | Sarkarnama

शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या मंत्र्याची हकालपट्टी करा : कॉंग्रेस 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 10 जुलै 2017

मुंबई : राज्यातील तूर उत्पादक शेतकरी तूर विक्रीसाठी हेलपाटे मारत आहे. आजही शेतकऱ्याच्या घरात तूर शिल्लक आहे. राज्याचे मंत्री मात्र नाफेडवर जावून पाहिजे तितकी तूर विक्री करत आहेत. या तूर विक्रीची चौकशी होत नाही. शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. या मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव व प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने करण्यात आलेली कर्जमाफीची योजना फसवी असल्याचे कॉंग्रेस पक्ष सातत्याने मांडत आहे. अर्बन बॅंका, पतसंस्था, मायक्रो फायनान्स कंपन्या यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे काय झाले, त्यांना कर्जमाफीत का आणले गेले नाही याबाबतही सरकार काहीही बोलत नाही. कर्जमाफीच्या नावाखाली हात चलाखी करण्यात आली आहे. आकडेवारी मोठी करून सांगण्यात आली आहे. राजा मोठा झाला आणि हाती भोपळा दिला असा भाजप सरकारचा कारभार सुरू असल्याची टीका यावेळी सावंत यांनी केली. 

89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार, 40 लाख शेतकऱ्याचा सातबारा कोरा होणार, 34 लाख कोटींची कर्जमाफी असे सरकारकडून सांगण्यात आले. त्याचवेळी आकडेवारी सरकारची 12 वर्षाची व कर्जमाफी फक्त 4 वर्षाची असल्याचे कॉंग्रेसने लक्षात आणून दिले. त्यावर सरकारने गुपचूप कर्जमाफीची मुदत 3 वर्ष आणखी वाढविली. मुदत 3 वर्ष वाढल्यावर आकडेवारी वाढायला हवी होती. मात्र आकडेवारी वाढली नाही. याचाच अर्थ सरकार पूर्वी खोटें बोलत असल्याचे उघड झाल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले. 

सरकारने सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी ही कॉंग्रेसची मागणी व भूमिका आहे. सरकारची मात्र तशी इच्छा नाही. सरकार जीआर बदलत आहे, शुद्धीपत्रक आणत आहे, पूर्वीची आश्वासने बदलत आहे. ही आता शेतकऱ्याची हक्काची लढाई आहे. सरकार शेतकऱ्यांना लाभ मिळू नये म्हणून पाऊले उचलत आहे. याविरोधात सरकारची भूमिका बदलली नाही तर कॉंग्रेस विधिमंडळ, रस्त्यावर तसेच न्यायालयात जाऊन शेतकऱ्यांसाठी लढाई करेल असा इशारा सचिन सावंत यांनी दिला आहे. 

संबंधित लेख