congress party and vote bank | Sarkarnama

जनसंपर्क अभियान कॉंग्रेसची नौका तारेल काय ?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

अकोला : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपविरुद्धचा जनआक्रोश संघटीत करण्यासाठी देण्यासाठी जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तीन टप्प्यात राबविण्यात येत असलेल्या या अभियानात कॉंग्रेसचे नेते, पदाधिकारी शहरासह ग्रामीण भाग पिंजून काढत असल्याने हे जनसंपर्क अभियान आगामी निवडणुकांमध्ये कॉंग्रेसची नौका तारेल काय ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

कधी काळी अकोला जिल्हा हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जात होता. लोकसभा, विधानसभेपासून तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर कॉंग्रेसची सत्ता असायची. मात्र, पक्षातर्गत कार्यकर्ते कमी आणि नेतेच जास्त वाढल्याने एकमेकांवर कुरघोडीच्या राजकारणातून पक्षाची वाताहत वाढतच गेली. कॉंग्रेस पक्षात गटा-तटाचे राजकारण येवढे वाढले की 1984 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार मधुकरराव वैराळे यांच्यानंतर कॉंग्रेस लोकसभेपासूनच आजपर्यंत दुरच राहिली. जिल्ह्यातील अनेक विधानसभा मतदारसंघातही कॉंग्रेसला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला. 

कॉंग्रेसची झालेली ही स्थिती अद्यापही सुधारली नसली तरी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला अच्छे दिन येण्याची अपेक्षा आहे. सत्ताधारी भाजप सरकारच्या कारभाराविषयी जनसामान्यांमध्ये वाढत असलेली नाराजी मतदानांमध्ये रुपांतर करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून कामाला लागले आहेत. 

कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, माजी मंत्री अजहर हुसेन, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, नातीकोद्दीन खतीब, प्रदेश महासचिव मदन भरगड, प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, महानगराध्यक्ष माजी आमदार बबनराव चौधरी, अकोला लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष महेश गणगणे, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते साजीद खान पठाण, हेंमत देशमुख, अविनाश देशमुख, प्रकाश तायडे, नगरसेवक डॉ. झिशान हुसेन, नगरसेवक पराग कांबळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा साधनाताई गावंडे, महानगराध्यक्ष सुषमा निचड, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंशुमन देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी सध्या शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिंजून काढत आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेता कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुरू केलेले हे जनसंपर्क अभियान पक्षाला नवचेतना देणारे असले तरी हे अभियान आगामी निवडणुकांमध्ये कॉंग्रेसची नौका तारेल काय? हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 
 
संबंधित लेख