कॉंग्रेस कार्यालयावर  मनसेचा हल्ला 

कॉंग्रेस कार्यालयावर  मनसेचा हल्ला 


मुंबई ः फेरीवाल्याच्या मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कॉंग्रेसचे मुंबई विभागीय अध्यक्ष संजय निरूपम यांच्यातील वादाचे पर्यावसन शुक्रवारी कॉंग्रेस कार्यालयावर हल्ला करण्यापर्यंत झाले. या संदर्भात मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असतानाच राज ठाकरे व मनसेच्या विरोधात कॉंग्रेससह अन्य पक्षांच्या नेत्यांनी टिकेची झोड उठविली. 


मुंबईतील एलफिन्स्टन रेल्वेस्थानकावरील घडलेल्या दुर्घनेनंतर राज ठाकरे यांनी परप्रांतिय फेरीवाल्यांचा मुद्या हातात घेतला. या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसेचे गालबोट लागले. हिसेचें हे लोण आज मुंबईतल्या कॉंग्रेस कार्यालयाच्या तोडफोडीपर्यंत गेले असतनाच हल्ल्याची जबाबदारी मनसेने स्वीकारली आणि मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतले. 


आजच्या घटनेमुळे मनसे विरुद्ध संजय निरुपम वाद आता आणखी चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली. आज सकाळी काही जणांनी आझाद मैदानातील कॉंग्रेसचे कार्यालय फोडले. हे कार्यालय आपण फोडल्याची जबाबदारी मनसेने घेतली. त्याबाबतचे ट्‌वीटसुद्धा संदीप देशपांडे यांनी केले. 


"भैय्या निरुपमवर सर्जिकल स्ट्राईक, इट का जवाब पथ्थरसे' असे ट्विट संदीप देशपांडे यांनी करीत हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. विशेष म्हणजे या ठिकाणावरून हाकेच्या अंतरावर आझाद मैदान पोलिस स्थानक आहे. या हल्ल्यानंतर कॉंग्रेसने मनसेविरोधात घोषणाबाजी केली. तसेच त्यांनी मनसेचे झेंडे जाळून निषेध व्यक्त केला. 

मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी, कोणी नसल्याचे बघून आमच्या पक्ष कार्यालयाची तोडफोड केली. पोलिस स्थानक 25 मीटर अंतरावर आहे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली नाही तर आम्हीही चोख उत्तर देऊ. 
संजय निरूपम, 
मुंबई विभागीय कॉंग्रेस अध्यक्ष 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com