congress not coming in power on tis own salman khurshid | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

कॉंग्रेस स्वबळावर सत्तेवर येऊ शकत नाही : सलमान खुर्शीद 

वृत्तसंस्था
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

कोलकोता : देशातील सद्यस्थिती लक्षात घेता कॉंग्रेस स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही, परंतू भाजपचा पराभव करण्यासाठी कॉंग्रेस समविचार पक्षाशी आघाडी करेल ही आघाडी करताना जागा वाटपाचाही पक्षाला त्याग करावा लागेल, हे वास्तव असले तरी 2019 मध्ये मोदी सरकारचा पराभव हेच आमचे लक्ष्य असल्याची माहीती कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी यांनी आज येथे दिली. 

"पीटीआय'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत खुर्शीद यांनी देशातील सध्याचे राजकारण, कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांबाबत स्पष्टपणे आपली मते मांडली आहेत. "" केंद्रातील मोदी सरकार कोणत्याही परिस्थिती घालविण्यासाठी समविचारी पक्षाशी आघाडी करावी याबाबत पक्षाच्या सर्वच नेत्यांमध्ये एकवाक्‍यता आहे. भाजपला सत्तेवरून खाली खेचले पाहिजे. हे सरकार गेलेच पाहिजे अशी पक्षाची धारणा आहे. त्यासाठी आघाडी करताना थोडा त्याग करावा लागला तरी चालेल असे पक्षातील सर्वच नेत्यांना वाटते. त्यामुळे कॉंग्रेस आघाडीसाठी नेहमीच एक पाऊल पुढे टाकत आहे असेही खुर्शीद यांनी स्पष्ट केले. 

कॉंग्रेस स्वबळावर सत्तेवर येऊ शकेल का ? असा प्रश्‍न खुर्शीद यांना केला असता ते म्हणाले, "" आजची परिस्थिती जर लक्षात घेतली तर अवघड वाटते. 
 
संबंधित लेख