काँग्रेसतर्फे नांदेडमधून अमिता चव्हाण तर हिंगोलीतून राजीव सातव जवळपास निश्चित 

सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता तसेच राजीव सातव यांची उमेदवारी कॉंग्रेसने निश्‍चित केली असल्याचे वृत्त आहे .
Chavans-&-Satav.
Chavans-&-Satav.

मुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी राज्य छाननी समितीने नांदेडमधून आमदार अमिता अशोक चव्हाण आणि हिंगोली मधून राजीव सातव यांची नावे अंतिम केला आल्याचे वृत्त आहे . आता या दोन नावांवर पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे शिक्कामोर्तब होण्याची औपचारिकता बाकी आहे . 


लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाली असून, कॉंग्रेसचे काही उमेदवार निश्‍चित झाल्याचे समजते. सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता तसेच राजीव सातव यांची उमेदवारी कॉंग्रेसने निश्‍चित केली असल्याचे वृत्त आहे . 


कॉंग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसच्या छाननी समितीची बैठक गुरुवारी रात्री पार पडली. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेते या प्रसंगी उपस्थित होते. कॉंग्रेसने गेल्या वेळी 26 जागा लढविल्या होत्या  पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक जागा कमी लढविण्यास काँग्रेस नेते तयार असल्याचे समजते . 

गेल्यावेळी २०१४ मध्ये देशभरात मोदी लाट असताना महाराष्ट्रात काँग्रेसचे फक्त दोन खासदार  निवडून आले होते . तेही नांदेड आणि हिंगोलीमधून . राजीव सातव यांनी निसटता विजय मिळविला होता तर अशोक चव्हाण यांनी ८० हजारांपेक्षा जास्त मत फरकाने विजय मिळविला होता. 

यंदाच्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्यावर पक्षाध्यक्षपदाची जबादारी असून त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे .त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नी आणि आमदार अमिता चव्हाण यांचे नाव लोकसभेसाठी पुढे केले आहे . अमिता चव्हाण सध्या भोकर मतदारसंघाच्या आमदार आहेत . गेल्यावेळी खासदारकी लढवताना अशोक चव्हाण यांनी आपला भोकर मतदारसंघ अमिता चव्हाण यांच्याकडे सोपवला होता . 


गेल्यावेळी भाजपचे संघटनात्मक बळ कमी असूनही भाजपचे डीबी पाटील यांनी लोकसभेला  चांगली टक्कर दिली होती . आता भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष्य राहील . 

हिंगोली मतदार संघात शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांनी काँग्रेसच्या राजीव सातव याची चांगलीच दमछाक केली होती . अखेर राहुल गांधी यांनी आपल्या विश्वासू सहकार्यासाठी हिंगोलीत पूर्वनियोजित दौरा नसताना  एक सभा घेतली होती . अशोक चव्हाण यांनी सातव यांना मदत केली नसती तर त्यांचे अवघड होते . यंदा  शिवसेनेकडून कोण उमेदवार असेल हे महत्वाचे ठरणार आहे .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com