पंतप्रधान माझ्या जिल्ह्यात आणि निमंत्रणपत्रिकेत माझे नाव कसे नाही ? काँग्रेस आमदार राठोड भडकले 

जनतेच्या पैशातून होणाऱ्या कार्यक्रमातून भाजपचे नेते पक्षाचा प्रचार करीत आहेत . -आमदार हरीभाऊ राठोड
PM-Modi-MLC-Rathod.
PM-Modi-MLC-Rathod.

यवतमाळ :  येत्या 16 फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावरून मानापमान नाट्य सुरू झाले आहे. या कार्यक्रमाला कॉंग्रेसच्या दोन व शिवसेनेच्या एका आमदाराचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याने मानापमान नाट्याला सुरूवात झाली आहे.

 महिला बचत गटाचा महामेळावा हा शासकीय कार्यक्रम आहे.

या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत राजशिष्टाचारानुसार जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदारांची नावे राहणे आवश्‍यक आहे. परंतु या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत कॉंग्रेसचे विधान परिषदेतील सदस्य हरीभाऊ राठोड व डॉ. वजाहत मिर्झा तसेच शिवसेनेचे विधान परिषद सदस्य तानाजी सावंत यांची नावे गायब आहेत. निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने भाजपच्या नेत्यांनी मुद्याम कॉंग्रेस व शिवसेनेच्या आमदारांची नावे गायब केल्याचा आरोप आमदार हरीभाऊ राठोड यांनी केला आहे.

या मानापमान नाट्याने राजकीय रंग घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजशिष्टाचार विभागाने निमंत्रण पत्रिका जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रकाशित केली नसल्याचा दावा केला आहे. या संदर्भात 'सरकारनामा'शी बोलताना उपजिल्हाधिकाऱ्यांनी निमंत्रण पत्रिकेत सर्वच लोकप्रतिनिधींची नावे राहणार असल्याचे  बोलताना स्पष्ट केले. 

या संदर्भात बोलताना आमदार हरीभाऊ राठोड म्हणाले, "भाजप हा शासकीय कार्यक्रम प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी करीत आहे. हा औचित्यभंग आहे. यासाठीच विरोधी पक्षातील आमदारांची नावे निमंत्रण पत्रिकेतून वगळण्यात आली आहे. जनतेच्या पैशातून होणाऱ्या कार्यक्रमातून भाजपचे नेते पक्षाचा प्रचार करीत आहेत ."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com