Congress MLA Amar Rajurkar Surprised to hear the Promises of own Party Workers | Sarkarnama

काँग्रेस नगरसेवक-पदाधिकाऱ्यांची आश्‍वासने ऐकुन आमदार राजूरकर अचंबीत

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या अपयशाबाबत जनजागरणासाठी निघालेली काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा येत्या रविवारी (ता.7) नाशिकला येत आहे. यानिमित्त नाशिक शहरात य. म. पटांगणावर सभा होईल. यासंदर्भात झालेल्या बैठकीत नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सभेला आपल्या किती समर्थकांची उपस्थिती राहील याची आकडेवारीच सांगितली.

नाशिक : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या अपयशाबाबत जनजागरणासाठी निघालेली काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा येत्या रविवारी (ता.7) नाशिकला येत आहे. यानिमित्त नाशिक शहरात य. म. पटांगणावर सभा होईल. यासंदर्भात झालेल्या बैठकीत नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सभेला आपल्या किती समर्थकांची उपस्थिती राहील याची आकडेवारीच सांगीतली. ती संख्या ऐकून तयारीसाठी आलेल्या आमदार राजुरकरांवर अचंबीत होण्याची वेळ आली. 

काँग्रेस पक्षातर्फे काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा येत्या रविवारी (ता.7) नाशिक जिल्ह्यात प्रवेश करील. यावेळी मार्गावरील विविध शहरात तिचे उत्साहात स्वागत केले जाणार आहे. यावेळी मालेगाव येथे जाहीर सभा होणार होती. मात्र आमदार रशीद शेख यांच्या घरी दुःखद घटना घडली आहे. त्या दुखवट्यामुळे मालेगावची सभा रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी सटाणा, चांदवड आणि नाशिक शहरात य. म. पटांगणावर सभा घेण्याचे ठरले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांसह विविध नेते यावेळी उपस्थित राहतील. 

यासंदर्भात तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार अमर राजुरकर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनात बैठक झाली. तेव्हा आढावा घेताना नगरसेवकांनी सभेला पाचशे नागरीक व समर्थक आणू असे सांगीतले. शाहू खैरे यांनी दोन हजार, हानीफ बशीर यांनी एक हजार तसेच अन्य सदस्यांनीही उत्साहाने आकडे सांगीतले. सर्व संख्या एकत्रीत केल्यावर ती हजारोंच्या घरात गेल्याने आमदार राजुरकरही अचंबीत झाली. बैठकीनंतर त्यांनी सभेच्या ठिकाणाची पाहणी केली. माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हा अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माजी आमदार शिरीष कोतवाल, नगरसेवक राहलु दिवे, सुरेश मारु, नगरसेविका हेमलता पाटील, स्वप्नील पाटील, बबलु खैरे, उध्दव पवार, रईस शेख, रमेश कहांडोळे, साधना जाधव, नरेश पाटील यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. 
...

संबंधित लेख