Congress Minister Imrati devi praises Jyotiadtya Shinde | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

ज्योतिरादित्य शिंदेनी हातात झाडू दिला दिला तरी मी खुश : काँग्रेस मंत्री इमरती देवी

वृत्तसंस्था
रविवार, 30 डिसेंबर 2018

ज्योतिरादित्य शिंदे हे माझे नेतेच नाहीत तर माझं दैवत असून मी त्यांची पूजा करते.

-काँग्रेस मंत्री इमरती देवी

ग्वाल्हेर : ज्योतिरादित्य शिंदेनी हातात  झाडू दिला दिला तरी मी खुश राहीन , असे विधान मध्य प्रदेशच्या महिला आणि बालकल्याण मंत्री इमरती देवी यांनी केले आहे . 

ग्वाल्हेर जिल्हा काँग्रेस कार्यालयास भेट दिल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना इमरतीदेवी बोलत होत्या . 

इमरती देवी म्हणाल्या , " मला महिला आणि बाळ कल्याण मंत्रालय ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामुळे मिळाले आहे . पण त्यांनी  माझ्या  हातात  झाडू दिला दिला तरी मी खुश राहीन. सध्या मी माझ्याकडे असलेल्या मंत्रालयाचा अभ्यास करीत असून वरिष्ठ नेत्यांच्या सल्ल्याने मी या खात्याचा कारभार करणार आहे ."

कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळात इमरती देवी यांना संधी मिळाली आहे . शपथविधी सुरु असताना शपथ वाचून दाखवताना इमरती देवी चार वेळा अडखळल्या होत्या . त्या ज्योतिरादित्य शिंदे गटाच्या मानल्या जातात . शपथविधी झाल्यावर पत्रकारांशी  बोलताना इमरती देवी यांनी 'ज्योतिरादित्य शिंदे हे माझे नेतेच नाहीत तर माझं दैवत असून मी त्यांची पूजा करते, असे वादग्रस्त विधान केले होते . 

ग्वाल्हेर जिल्ह्यातील डबरा मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. या मतदारसंघातून त्या २००८ , २०१३ आणि यंदा २०१८ असे सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत . 

दरम्यान  भाजप नेत्यांनी इमरती यांना मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी केली आहे . इमरती देवी यांच्या विरुद्ध सुनेचा छळ करण्याबाबत खटला सुरु आहे. 

संबंधित लेख