Congress lodges complaint against guardian minister in Latur | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

पालकमंत्री निलंगेकरांच्या घरावर भाजपचा झेंडा, कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 एप्रिल 2017

पक्षाचा झेंडा काढला

कॉंग्रेसने पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा
लावल्याची तक्रार निवडणुक आयोगाकडे केल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास
हा झेंडा काढून टाकण्यात आल्याची माहिती आहे.

लातूरः महापालिकेसाठी मतदान सुरु असतांना पालकमंत्री संभाजी पाटीलनिलंगेकर यांच्या घरावर भाजपचा झेंडा फडकत होता, आदर्श आचारसंहितेचा हाभंग असल्याची लेखी तक्रार कॉंग्रेसने राज्य निवडणूक आयोग तसचे मुख्य
निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे केल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवलेआहे.

घरावर भाजपचा झेंडा फडकत असल्याचा व्हिडिओ देखील कॉंग्रेसकडून सोशलमिडियावर व्हायरल करण्यात आला आहे.

मतदानाच्या एक दिवस आधीच भाजप आणि कॉंग्रेसमध्ये खटके उडत होते. पैसेवाटल्याच्या आरोपावरून भाजप उमेदवाराचे पती विनोद मालू यांना कालकॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जबर मारहाण करत त्यांच्या अंगावर उकळता चहाफेकला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरकॉंग्रेसकडून भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ व्हायरलकेल्याचा दावा करण्याता आला होता. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यामधीलधुसफुसीचा आज मतदानाच्या दिवशी भडका होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन
पोलीसांनी शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यानकॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी दुपारी संभाजी पाटील निलंगेकर यांच्याघरावर भाजपचा झेंडा फडकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल करत भाजप विरोधातआचारसंहिता भंग केल्याची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. हा
प्रकार वगळता लातूर महापालिकेसाठी शांततेत मतदान झाले. दुपारी साडेतीनवाजेपर्यंत 42 टक्के एवढ्या सरासरी मतदानाची नोंद झाली होती.

उन्हाचा मतदानावर परिणाम

मराठवाड्यात सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्याचा परिणाममहापालिका निवडणुकीच्या मतदानावार होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.सकाळा साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर साडेनऊ पर्यंत केवळ 8टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतर साडेकरापर्यंत 23.90 व दुपारी
दीड पर्यंत सरासरी 32 टक्के मतदान झाले होते. साडेसहा वाजेपर्यंत 55 ते60 टक्के एवढे मतदान होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

संबंधित लेख