Congress leaders making childish allegations : Patil | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

पराभवामुळे भ्रमिष्ट झालेल्या काँग्रेसकडून बालीश आरोप : चंद्रकांतदादा पाटील

 सरकारनामा न्यूज ब्युरो
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

मुंबई : पंचायत ते पार्लमेंट सर्व निवडणुकांमध्ये सतत पराभव झाल्यामुळे काँग्रेस पक्ष भ्रमिष्ट झाला असून निराशेपोटी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर बालीश आरोप करत आहे, असा प्रत्यारोप राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी मुंबईत केला. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमित शाह यांच्या मुलावर काँग्रेस पक्षाने केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत, असा त्यांनी दावा केला.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी  व प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही सोमवारी भाजपाला जबरदस्त यश मिळाले. त्यामुळे हताश झालेले काँग्रेसचे नेते बालीश आरोप करतात. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जय शाह यांच्या कंपनीला ८० कोटी नफा झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. प्रत्यक्षात जय शाह यांच्या कंपनीची उलाढाल ८० कोटी होती. पृथ्वीराज चव्हाण अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलत आहेत.

अमित शाह यांच्या मुलाला कोणताही लाभ झालेला नाही. खोटी बातमी देऊन बेछूट आरोप करणाऱ्या वेबसाईटप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही बदनामीचा दावा ठोकू, अशी तंबी पाटील यांनी दिली.

विनोद तावडे यांनी सांगितले की, जय शाह यांच्या कंपनीच्या बाबतीत काहीही चुकीचे काम केलेले नाही. त्यांनी सच्चाईने व्यवहार केला आहे. अशा प्रकारे खोटे आरोप करून भारत काँग्रेसमुक्त करण्यापासून भाजपाला कोणीही रोखू शकत नाही. 

संबंधित लेख