congress leaders complain agaist about sanjay nirupam | Sarkarnama

संजय निरूपम यांची उचलबांगडी होणार ?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

मुंबई ः ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांच्या निधनानंतर मुंबई कॉंग्रेसमधील घडामोडींना वेग आला आहे. मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांची उचलबांगडी होणार का ? याकडे राजकीय निरिक्षकांचे लक्ष लागले आहे. 

कामत गटाचे निष्ठावंत जनार्दन चांदुरकर यांनी कॉंग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन मुंबई कॉंग्रेसमधील गटबाजी कानावर घातली आहे. 

या बैठकीत निरूपम यांच्या जागी राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे असणारे मिलिंद देवरा यांना आणावे अशी मागणी त्यांनी केल्याचे समजते. 

निरूपम यांच्या एककल्ली कारभारावर बोट ठेवून यापूर्वी कृष्ण हेगडे, राजहंस सिंह, समिर देसाई, यांच्यासह अनेकांनी कॉंग्रेस सोडली असल्याचे बोलले जाते. त्याच वाटेवर कृपाशंकर सिंह असताना कामत यांच्या निधनाने कामत गटाच्या निष्टावानांना वाली उरला नाही. त्यामुळे मुंबई कॉंग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्याचे बोलले जाते. या कठीण परिस्थितीत मुंबई कॉंग्रेस सावरली पाहिजे यासाठी अध्यक्ष बदला पाहिजे, अशी भुमिका कामत गटाने घेतल्याचे सूत्रांकडून समजते. 

याबाबत प्रभारी खरगे यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कानावर घालावे अशी मागणी या गटाकडू होत आहे. 

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांच्या निधनानंतर मुंबई कॉंग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभुमिवर मुंबई कॉंग्रेस अधिक बळकट होण्याची गरज आहे. ही भावना राहुल गांधी यांच्या कानावर घालण्यासाठी खरगे यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांनी दिलेल्या नेतृत्वाखाली आम्ही काम करण्यास तयार आहोत असे ज्येष्ठ नेते जनार्दन चांदुरकर यांनी सांगितले. 

संबंधित लेख