Congress Leader Gurudas Kamat Passes Away | Sarkarnama

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे दिल्लीत निधन

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज सकाळी दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. 

नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज सकाळी दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. 

कामत यांनी एनएसयुआयचे अध्यक्षपदही भुषविले होते. ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते १९८४, १९९१, १९९८ आणि २००४ मध्येही निवडून गेले होते. मुंबईच्या पश्चिम उपनगरात गुरुदास कामत यांचं वर्चस्व होतं. युपीए सरकारच्या काळात ते राज्यमंत्री होते. काँग्रेसनं त्यांच्याकडे गुजरात, राजस्थान, दादरा आणि नगर हवेली आदी राज्यांची जबाबदारी सोपवली होती. मात्र, गेल्या वर्षी त्यांचा मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्याबरोबर वाद झाले होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या सर्वच पदांचा राजीनामा दिला होता. २०१४ मधील निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांनी कामत यांचा पराभव केला होता.

संबंधित लेख