congress leader gurudas kamat no more | Sarkarnama

कॉंग्रेसचे नेते गुरुदास कामत यांचे निधन

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत (वय 63) यांचे आज दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत (वय 63) यांचे आज दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, दिल्लीतल्या प्रायमस रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

मुंबई काँग्रेसमधील वादामुळे त्यांनी आपल्या पदांचा गेल्या वर्षी राजीनामा दिला होता. कामत यांना गांधी कुटुंबियांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जायचे. 5 ऑक्टोबर 1954 रोजी कामत यांचा कर्नाटकातील अंकोला येथे जन्म झाला होता. ते मुंबईतील कुर्ल्यात राहत होते. त्यांचे वडील आनंदराव कामत हे ऑटोमोबाईल्समध्ये काम करायचे. 

कामत हे 1984 मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. पाचवेळा ते ईशान्य मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये 2009 ते 2011 या काळात केंद्रिय गृहराज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.

काँग्रेसमधील अभ्यासू नेते म्हणून कामत ओळखले जायचे. काँग्रेसमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पडत संघटनकौशल्य सिद्ध केले होते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख