congress leader anurag shinde resign | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी कॉंग्रेसचे पंचायत समिती सदस्य अनुराग शिंदे यांचाही राजीनामा 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 जुलै 2018

औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार झुलवत आहे. समाजाच्या भविष्यासाठी कानडगावचे काकासाहेब शिंदे हुतात्मा झाले, तरीही सरकारला जाग येत नाही असा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्थ कांग्रेसचे पंचायत समिती सदस्य अनुराग अप्पासाहेब शिंदे यांनी बुधवारी (ता.25) सदस्यपदाचा राजीनामा दिला. ते गेवराई ब्रुक बॉण्ड गणाचे सदस्य आहेत. 

पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एम.सी. राठोड यांच्याकडे अनुराग शिंदे यांनी त्यांचा राजीनामा सोपवला. गेल्या चार वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाजाने महाराष्ट्रभर 58 मराठा क्रांती मुकमोर्चे शांततेत काढले. 

मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा सामजाला आरक्षण देण्याच्या नावाखाली झुलवत ठेवले. प्रकरण न्यायप्रविष्ट ठेवुन मराठा समाजाची दिशाभुल केली आहे आणि आरक्षणापासून समाजाला वंचित ठेवले आहे. आरक्षणाअभावी समाजाची अर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. 

मराठा तरुण बेरोजगार झाले आहेत, त्यांना उपजिविकेचे साधन राहिले नाही. शासकीय नोकरीत आरक्षण नसल्याने मराठा तरुण नैराश्‍यातुन आत्महत्या करत आहेत. तरीही याची शासन, प्रशासन गांभीर्याने दखल घेत नाही. या घटनेचा निषेध म्हणुन आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे यासाठी मी माझ्या पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या निवदेनात म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख