congress krupa shankarsingh | Sarkarnama

कॉंग्रेसचे "कृपा' शंकर म्हणाले,"" भाजपवर सगळे नाराज !'' 

पोपट गवांदे 
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

इगतपुरी ः कॉंग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह खूप दिवसांनी जागे झाले असून त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपला लोकांनी सत्तेवर आणले, मात्र या पक्षाने अशी धोरणे राबविली की लोकांची निराशा झाली त्यामुळे या पक्षावर लोक नाराज असल्याची टीका त्यांनी केली. 

येथील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीला सिंह उपस्थित होते झाली. ते म्हणाले,"" भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकरी, उद्योजक दिशाहीन आहेत. सगळेच घटक हवालदिल झाले आहेत. निवडणूक काळात दिलेली आश्वासने सरकारला पाळता आलेली नाहीत. त्यामुळे जनता भाजप सरकारवर नाराज आहे. सरकारविरोधात रस्त्यावर उतरलेले सामाज घटक, संघटना पाहिल्या तर लक्षात येते. कॉंग्रेस पक्षाला एक राजकीय सभ्यता व संस्कृती आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाचे भवितव्य उज्ज्वल आहे. कार्यकर्ते, युवकांनी मरगळ झटकुन आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागावे. 

यावेळी ज्येष्ठ नेते मधुकर कोकणे, पांडुरंग शिंदे, धनराज शर्मा, बाळासाहेब वालझाडे, माजी नगरसेवक शोभराज शर्मा, शहराध्यक्ष उमेर शेख, भाऊ पासलकर आदी उपस्थित होते.  
 
संबंधित लेख