Congress Jansanghrsha Yatra Malegaon | Sarkarnama

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेद्वारे मालेगावला 'एमआयएम'ची नाकेबंदी? 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेचे आज सकाळी मालेगावला आगमन झाले. यावेळी यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. यानिमित्त सकाळी जाहीर सभा झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हुसेन दलवाई, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, महापौर रशीद शेख, आमदार आसीफ शेख, आमदार निर्मला गावीत, आमदार कृणाल पाटील, डॉ. शोभा बच्छाव आदी नेते उपस्थित होते. 

मालेगाव : काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे आज मालेगाव शहरात उत्साही स्वागत झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी "भाजपने सामान्यांचा विश्‍वासघात केला आहे. या पक्षाला फायदा होईल अशी छुपी आघाडी, अन्‌ घरोबा करण्याचा प्रयत्न झाल्यास जनतेने अजिबात सहन करु नये," असे आवाहन केले. याद्वारे त्यांनी 'एमआयएम'ची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेचे आज सकाळी मालेगावला आगमन झाले. यावेळी यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. यानिमित्त सकाळी जाहीर सभा झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हुसेन दलवाई, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, महापौर रशीद शेख, आमदार आसीफ शेख, आमदार निर्मला गावीत, आमदार कृणाल पाटील, डॉ. शोभा बच्छाव आदी नेते उपस्थित होते. 

खासदार चव्हाण म्हणाले, "केंद्र व राज्यातील भाजप सरकार घोटाळे, गैरकाराभारत अडकले आहे. राफेलचा मोठा घोटाळा त्यांनी केला आहे. शेतकरी, महिला, समाजाला महागाईत ढकलले आहेत. येत्या निवडणुकीत त्यांना सत्तेबाहेर घालवले नाही तर यापुढे हे हुकुमशहा निवडणुकांच होऊ देणार नाहीत. त्यामुळे या भाजपला छुपी मदत होईल अशी आघाडी, पाठींबा कोणी देत असले तर मतदारांनी जागरुकपणे ते कारस्थान उधळुन लावावे,"

'एमआयएम' कडून आगामी निवडणुकीत मालेगाव शहरात उमेदवाराचा शोध सुरु आहे. सहकारी पक्षाचे काही नेते त्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे खासदार चव्हाण यांच्या या भूमिकेद्वारे मालेगाव मध्ये उमेदवाराचा शोध करणाऱ्या 'एमआयएम'ची नाकंबेदीचा डाव टाकला आहे. स्थानिक नेत्यांनाही त्यांनी तशा सूचना दिल्याने पक्षाचे पदाधिकारी जागरुक झाले आहेत. त्यामुळे जनसंघर्ष यात्रेची ही सभा मतदार, कार्यकर्त्यांसाठी संदेश देणारी ठरली आहे. 

संबंधित लेख